• Download App
    रस्त्याच्या कामाचं श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादीचा आमदार अन् शिवसेनेच्या माजी आमदारात जुंपली, मविआ नेत्यांमधील वाद पाहून उपस्थितही अवाक्। NCP MLA Atul Benke Arguments With former Shiv Sena MLA for taking credit for road works in Junnar Pune

    रस्त्याच्या कामाचं श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादीचा आमदार अन् शिवसेनेच्या माजी आमदारात जुंपली, मविआ नेत्यांमधील वाद पाहून उपस्थितही अवाक्

    महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षांत बेबनाव दिसून येतो. स्थानिक नेत्यांमध्ये या ना त्या कारणावरून वाद होत असल्याचे नेहमीच समोर येत आहे. असाच एक प्रकार जुन्नरमध्ये समोर आला. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर आले. त्यांच्या जोरदार शाब्दिक वाद झाल्याचे उपस्थितांनी पाहिले. यानंतर काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. NCP MLA Atul Benke Arguments With former Shiv Sena MLA for taking credit for road works in Junnar Pune


    प्रतिनिधी

    पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षांत बेबनाव दिसून येतो. स्थानिक नेत्यांमध्ये या ना त्या कारणावरून वाद होत असल्याचे नेहमीच समोर येत आहे. असाच एक प्रकार जुन्नरमध्ये समोर आला. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर आले. त्यांच्या जोरदार शाब्दिक वाद झाल्याचे उपस्थितांनी पाहिले. यानंतर काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.

    जुन्ररमध्ये काय घडलं ?

    जुन्नरच्या उंब्रजमध्ये मुख्यमंत्री रस्ता योजनेच्या कामाचं श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांमध्ये चांगलाच वाद रंगला. गावाच्या रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार बेनके हजर राहणार होते, परंतु या कार्यक्रमाला शिवसेनेला मात्र आमंत्रणच देण्यात आलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांच्या नावे असणाऱ्या योजनेचं श्रेय राष्ट्रवादी घेत असल्याने माजी आमदार सोनवणे तेथे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आधी हजर झाले. काही वेळाने बेनके आल्यावर दोघेही एकमेकांच्या बाजूला बसले आणि मग या वादाला जाहीर सुरुवात झाली.



    सोनवणे यांनी बोनके यांना श्रेय घेण्यासंबंधी विचारत असताना हाताला स्पर्श केला. यावरून बेनके संतापले आणि “मला हात लावायचा नाही, हात खाली घ्या,” असं सुनावलं. त्यानंतर बेनकेंनी उत्तर देत “हात लावायचा नाही म्हणजे काय? आपण फक्त स्पर्श केला असून पटत नसेल तर मग माझ्या बाजूला कशाला बसले?,” अशी प्रतिप्रश्न केला.

    आजी आणि माजी आमदारांमध्येच अशी वादावादी सुरू असल्याचे पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटले. यानंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. वाद मिटल्यानंतर पुन्हा दोन्ही नेते एकमेकांशी चर्चा करू लागले होते. पण यामुळे काही काळासाठी तणाव मात्र निर्माण झाला.

    NCP MLA Atul Benke Arguments With former Shiv Sena MLA for taking credit for road works in Junnar Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस