• Download App
    भाकऱ्या फिरवल्या गर्रागर्र, तरी राष्ट्रवादीचे पहिले पाढे पंचावन्न!! NCP exercised lot of changes but couldn't get much public support

    भाकऱ्या फिरवल्या गर्रागर्र, तरी राष्ट्रवादीचे पहिले पाढे पंचावन्न!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाकऱ्या फिरवल्या गर्रागर्र, तरी पहिले पाढे पंचावन्न!!, अशी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची स्थिती झाली आहे. न्यूज एरिना इंडिया वृत्तसंस्थेने महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघांच्या केलेल्या सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसला 50 ते 55 जागा मिळतील, असे दाखविले आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 ते 2023 संख्यात्मक पातळीवर अथवा पक्ष वाढीसाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. NCP exercised lot of changes but couldn’t get much public support

    कारण 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 53 आमदार निवडून आणता आले होते. त्यानंतर 2.5 वर्षांच्या शिवसेनेबरोबरच्या सत्तेतून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे राजकीय आर्थिक भांडवलीकरण केले. पण त्याचा राष्ट्रवादीला जनाधार वाढवण्यासाठी कोणताही लाभ झालेला सर्वेक्षणाच्या आकडेवारीतून दिसत नाही. राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या टॅलीत तसूभरही फरक पडलेला दिसत नाही.

    झी न्यूजने आधी केलेल्या सर्वेक्षणात देखील राष्ट्रवादीची फारशी वेगळी अवस्था नव्हती. दरम्यानच्या काळात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या भाकऱ्या फिरवल्या. पक्ष संघटना वाढीसाठी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या रूपाने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले. मराठी माध्यमांनी शरद पवारांनी भाकऱ्या फिरवल्याचा मोठा डंका पिटला. सुप्रिया सुळे आता राष्ट्रवादीची संघटना पूर्णपणे ताब्यात घेऊन तिला कार्यप्रवण करणार, अशा बातम्या प्रसिद्ध केल्या. महाराष्ट्रभर शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीची मोठी वातावरण निर्मिती केली. पण प्रत्यक्षात मतदारांवर मात्र या वातावरण निर्मितीचा काहीही फरक पडलेला दिसत नाही. कारण राष्ट्रवादीची टॅली 50 ते 55 च्या पुढे सरकलेलीच दिसत नाही.

    इतकेच नाही तर ठाकरे काय किंवा पवार काय, या दोघांचे पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून आकुंचित होताना दिसत आहेत. कारण एकीकडे भाजप तिसऱ्यांदा शंभरी ओलांडत 125 चा आकडा पार करतो आहे, तर काँग्रेस देखील आपला “पॉलिटिकल डेफिसिटी” काहीसा भरून काढत महाविकास आघाडीचा लाभ घेत आपली टॅली 50 – 55 करत आहे.

    यात सर्वाधिक तोटा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा होत असला, तरी त्या तोट्यात पवारांची राष्ट्रवादी देखील वाटेकरी आहे. कारण पवारांनी स्वतःच्या निवृत्ती नाट्याची फार मोठी राजकीय घडामोड घडवली, त्यानंतर दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी दोन कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक केली, राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी वेगवेगळ्या सरचिटणीसांच्या नेमणुका आणि त्यांना वेगवेगळ्या राज्यांच्या दिलेल्या जबाबदाऱ्या दिल्या. एवढी मोठी राजकीय मशक्कत करूनही पवारांच्या राष्ट्रवादीचे “पहिले पाढे पंचावन्न”!!, अशीच राजकीय अवस्था झाल्याचे दिसत आहे. झी न्यूज पाठोपाठ एरिना न्यूजच्या सर्वेक्षणाची आकडेवारी राष्ट्रवादीची नेमकी अवस्था उघडकीस आणत आहे.

    NCP exercised lot of changes but couldn’t get much public support

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस