• Download App
    राष्ट्रवादीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला दोन कोटींची मदत, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांची सूचना । NCP Donates 2 crore to CM Relief Fund, Sharad Pawar Directs NCP Leader After discharge from hospital

    राष्ट्रवादीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला दोन कोटींची मदत, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांची सूचना

    Sharad Pawar : राज्यात कोरोनामुळे उद्वभवलेल्या अभूतपूर्व संकटात शासनाच्या तिजोरीवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. याकरिता याआधी महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत जाहीर केली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पक्षातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तशा सूचना त्यांनी पक्षनेत्यांना दिल्या आहेत. NCP Donates 2 crore to CM Relief Fund, Sharad Pawar Directs NCP Leader After discharge from hospital


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात कोरोनामुळे उद्वभवलेल्या अभूतपूर्व संकटात शासनाच्या तिजोरीवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. याकरिता याआधी महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत जाहीर केली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पक्षातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तशा सूचना त्यांनी पक्षनेत्यांना दिल्या आहेत.

    शरद पवार यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून बाहेर येताच शरद पवार यांनी तातडीने पत्र लिहून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पक्षातर्फे आर्थिक मदत जाहीर केली. लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ज्यांना शक्य आहे, लसीचा खर्च परवडणारा आहे अशांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार तसेच सर्व खासदार एक महिन्याचे वेतन सीएम फंडात देणार आहेत. लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येत आहे.

    यापूर्वी काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली होती. थोरात यांनी स्वत:चे एक वर्षाचे वेतन आणि काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय थोरात यांच्या संगमनेरमधील अमृत उद्योग समूहातर्फे 5 हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाचे पैसेही मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहेत.

    NCP Donates 2 crore to CM Relief Fund, Sharad Pawar Directs NCP Leader After discharge from hospital

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ममता आणि पवारांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या नुसत्या चर्चा; पण अजून कार्यवाही का होई ना??

    Gulf of Aden : भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला; एडनच्या आखातात आयएनएस त्रिकंडच्या मार्कोस कमांडोना पाहताच दरोडेखोर पळून गेले

    Supreme Court : सुप्रीम कोर्ट म्हणाले- निर्णयांमधील AI ची खोटी उदाहरणे धोकादायक; हे मिथाइल आयसोसायनेटसारखे, यामुळे न्यायव्यवस्थेचे नुकसान