• Download App
    राष्ट्रवादी वर्धापनदिनी शरद पवार म्हणाले, शिवसेना हा सर्वात विश्वासार्ह पक्ष, सरकार पाच वर्षे टिकेल! । NCP Chief Sharad pawar says Shiv sena Is Trustworthy party on NCP Anniversary in Mumbai

    राष्ट्रवादी वर्धापनदिनी शरद पवार म्हणाले, शिवसेना हा सर्वात विश्वासार्ह पक्ष, सरकार पाच वर्षे टिकेल!

    NCP Chief Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोगत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारापासून ते विरोधकांवरही दिलखुलास वक्तव्य केलं. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ पंतप्रधांनाना भेटलं. यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचीही एकांतात भेट झाली. त्यावर अनेकांनी शंकाकुशंका घेतल्या. या शंका घेणारे वेगळ्याच नंदनवनात राहतात. शिवसेना हा सर्वात विश्वासार्ह पक्ष आहे. महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल. NCP Chief Sharad pawar says Shiv sena Is Trustworthy party on NCP Anniversary in Mumbai


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोगत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारापासून ते विरोधकांवरही दिलखुलास वक्तव्य केलं. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ पंतप्रधांनाना भेटलं. यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचीही एकांतात भेट झाली. त्यावर अनेकांनी शंकाकुशंका घेतल्या. या शंका घेणारे वेगळ्याच नंदनवनात राहतात. शिवसेना हा सर्वात विश्वासार्ह पक्ष आहे. महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल.

    मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकांतात भेटल्याने त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांचं खंडन करत पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. राज्यात वेगळ्या विचाराचं सरकार स्थापन केलं. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं लोकांना कधीच वाटलं नव्हतं. पण आपण एकत्र आलो. पर्याय दिला. लोकांनी हा पर्याय स्वीकारला असून आपली यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. कुणी काही म्हणो, सरकारची वाटचाल दमदार सुरू असल्याचंही ते म्हणाले.

    आपल्या देशात अनेक पक्ष निर्माण झाले. काही टिकले, तर काही कधी गेले ते कळलंही नाही. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात 70च्या दशकात पक्ष स्थापन झाला होता. या पक्षाची अकरा राज्यांत सत्ता आली. पण दीड वर्षही हा पक्ष टिकू शकला नाही. आपण 22 वर्षे टिकून आहोत. 15 वर्षे आपण सत्तेत होतो. मधल्या काळात सत्तेत नव्हतो. त्याने काही फरक पडत नाही, असंही पवार म्हणाले.

    यादरम्यान, अनेक जण सोडून गेले. पण नवीन लोक तयार झाले आहेत. नव्या लोकांचं कर्तृत्व कधीच दिसलं नव्हतं. त्यांना संधी मिळाली आणि त्यांचं कर्तृत्व समोर आलं. देशभर कोरोनाचं संकट असताना राजेश टोपेंनी चांगलं काम केलं. राजेंद्र शिंगणेही चांगलं काम करत आहेत. राजकारणात तरुणांना नेहमीच संधी दिली पाहिजे. पिढी तयार केली पाहिजे. राष्ट्रवादीने ही पिढी तयार केली आहे, असंही पवार म्हणाले.

    सत्ता ही महत्त्वाची आहे. पण एकाच ठिकाणी सत्ता राहता कामा नये. एकाच ठिकाणी सत्ता राहिली, तर सत्ता भ्रष्ट होते. त्यामुळे सत्ता ही सर्वसामान्यांपर्यंत गेली पाहिजे, त्यादृष्टीने प्रत्येकाने कामं केलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

    NCP Chief Sharad pawar says Shiv sena Is Trustworthy party on NCP Anniversary in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले