• Download App
    Nashik TCS Case: Shahrukh’s Wife Dismisses Conversion Claims as ‘Jokes’ नाशिक TCS कांड; शाहरुखची पत्नी म्हणाली- ते सहकाऱ्यांची फक्त थट्टा-मस्करी करायचे

    Nashik TCS Case : नाशिक TCS कांड; शाहरुखची पत्नी म्हणाली- ते सहकाऱ्यांची फक्त थट्टा-मस्करी करायचे

    Nashik TCS Case

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : Nashik TCS Case देशभर चर्चेत राहिलेल्या नाशिक TCS कांडात आता आणखी एक बाजू समोर आलीय. या प्रकरणातला संशयित आरोपी शाहरुखची पत्नी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. तिने सर्व आरोप फेटाळले. धर्मांतरासारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. सोबतच शाहरुख सहकाऱ्यांशी फक्त थट्टा-मस्करी करायचा. त्याला केलेली अटक, पुरावे या साऱ्यांवरच तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून, एचआर मॅनेजर निदा खान अद्यापही फरार असल्याचे समजते.Nashik TCS Case

    नाशिकमधील TCS BPO कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण झाले. धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर तक्रारी पोलिसांकडे आल्या. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या 7 अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्यात. 26 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान 9 महिलांनी एफआयआर (FIR) दाखल केले. त्यांनी कंपनीच्या मुस्लिम टीम लीडर्स आणि एचआर (HR) मॅनेजरवर लैंगिक छळवणुकीसह जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासारखे गंभीर आरोप केलेत. त्यामुळे थेट दिल्लीपर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटलेत.Nashik TCS Case



    ‘धर्मांतराचे आरोप खोटे’

    संशयित आरोपी शाहरुखच्या पत्नीने ‘आजतक’शी बोलताना सर्व आरोप फेटाळलेत. शाहरुखच्या पत्नी म्हणाली की, “सर्वात आधी एफआयआरमध्ये नक्की काय लिहिले आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. एफआयआरमध्ये जे म्हटले आहे, त्यात कुठेही धर्मांतर किंवा कोणतेही रॅकेट चालवल्याचा आरोप नाही. त्यात फक्त इतकेच म्हटले आहे की, ते थट्टा-मस्करी करायचे किंवा गप्पा मारायचे.” हे प्रकरण धर्मांतर रॅकेट म्हणून ज्या प्रकारे मांडले जात आहे, ते चुकीचे आणि खोटे असल्याचे तिने सांगितले.

    शाहरुखने महिला कर्मचाऱ्यांच्या पेहरावावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, “कॉर्पोरेट क्षेत्रात जर कोणी कोणाच्या कपड्यांवर काही बोलले, तर ते सहसा कौतुक (कॉम्प्लिमेंट) असते. याचा अर्थ असा नाही की कोणी कोणाला जज करत आहे किंवा त्रास देत आहे.” या आरोपांना विनाकारण मोठे करून दाखवले जात असल्याचे तिने स्पष्ट केले.

    ‘त्या’ मुलींना कधी पाहिलेही नाही…

    काही तक्रारींमध्ये असा दावा करण्यात आला होता की, महिला कर्मचाऱ्यांना रिसॉर्टवर नेण्याचे प्रस्ताव दिले गेले. यावर शाहरुखची पत्नी म्हणाली की, “हे सर्व पूर्णपणे खोटे आहे. ज्या मुलींची नावे समोर आली आहेत, त्यांना आम्ही कधी पाहिले देखील नाही. माझे पती स्वतः टीम लीडर आहेत आणि त्यांच्या हाताखाली 15-20 लोक काम करतात. जर कोणी चूक केली तर ते ओरडतात आणि चांगले काम केले तर कौतुकही करतात. पण या आरोपांना कोणताही आधार नाही.”

    तिने पुढे असेही सांगितले की, दुसरा एक आरोपी दानिश आणि एका महिला कर्मचारी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, ज्याचा आता या प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे. “आम्हाला माहिती आहे त्यानुसार, त्यांच्यात चार वर्षांपासून नाते होते आणि ही बाब कॅम्पसमध्ये सर्वांना ठाऊक होती. जर दोन सज्ञान व्यक्ती नात्यात असतील, तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे,” असे ती म्हणाली.

    ‘इतक्या वर्षात एकही तक्रार नाही’

    शाहरुखच्या पत्नीने त्याच्या कामाच्या रेकॉर्डचाही उल्लेख केला. ती म्हणाली की, तो अनेक वर्षांपासून तिथे काम करत आहे. जर असा काही प्रकार असता तर आधीच तक्रारी आल्या असत्या. पण आजवर त्याच्याविरुद्ध एकही तक्रार आलेली नाही. नुकतीच त्याने कंपनीची एक मोठी परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्याला प्रमोशन देखील मिळाले होते.

    एफआयआरमध्ये काही ठिकाणी हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचाही आरोप आहे. यावर पत्नीने सांगितले की, “आम्हाला याबद्दल काहीच माहित नव्हते. जेव्हा या गोष्टी समोर आल्या तेव्हा आम्हाला समजले. मी स्वतः पतीला विचारले, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी कधीही असे विधान केलेले नाही. टीसीएस सारख्या मोठ्या आणि व्यावसायिक कंपनीत काम करणारी व्यक्ती अशा गोष्टी कशी करू शकते, हे अनाकलनीय आहे.”

    अटकेआधी नोटीसही नाही

    शाहरुखच्या अटकेबाबतही त्याच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले. तिने सांगितले की, “1 एप्रिलच्या रात्री पोलीस साध्या गणवेशात आमच्या घरी आले आणि स्टेटमेंटवर सही करण्यासाठी शाहरुखला सोबत यावे लागेल असे सांगितले. आम्ही पूर्ण सहकार्य करत होतो, त्यामुळे तो त्यांच्यासोबत गेला. पण नंतर समजले की त्याला अटक करण्यात आली आहे. आम्हाला आधी कोणतीही नोटीस दिली गेली नव्हती.”

    कार्यालयातील इतर लोक तिथे उपस्थित असताना केवळ काही ठराविक लोकांनाच का अटक करण्यात आली, असा आरोपही तिने केला. महिला कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याच्या आरोपावर ती म्हणाली, “हे आरोपही धादांत खोटे आहेत. जर असे काही घडले असते तर त्याचे पुरावे असायला हवे होते. इतका मोठा तपास सुरू आहे, पण अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.”

    ‘चार वर्षे गप्प का राहिल्या?’

    तिने सवाल केला की, “जर कोणासोबत इतके काही घडत होते, तर त्यांनी आधी तक्रार का केली नाही? कंपनीत मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांना का सांगितले नाही?” थेट इतके मोठे आरोप करणे आणि ते मीडियात अशा प्रकारे प्रसिद्ध करणे योग्य नसल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे कुटुंब तपासात पूर्ण सहकार्य करत असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे तिने शेवटी सांगितले.

    Nashik TCS Case: Shahrukh’s Wife Dismisses Conversion Claims as ‘Jokes’

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik TCS Case : ‘हे धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित कट; नाशिक TCS प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत आरोप

    Jihad : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची एनआयएकडून चौकशी; दुसऱ्या गुन्ह्यात दोघांना 2 दिवस कोठडी