• Download App
    Nashik TCS Case | The Focus India

    Nashik TCS Case

    Nashik TCS Case : नाशिक TCS प्रकरणात नवा दावा; ‘अजमेरच्या मौलवीकडे पाठवले, धर्मांतराचे प्रशिक्षण दिले’, निदा खानविरोधातील आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

    नाशिकमधील गाजलेल्या TCS कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून काही गंभीर दावे समोर आले आहेत. मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खान हिने पीडित तरुणीला धर्मांतरासाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिला अजमेरमधील एका मौलवीशी संपर्कात आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    Read more

    Nashik TCS Case : नाशिक टीसीएस प्रकरणात धक्कादायक आरोप, झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून ‘ब्रेनवॉश’ केल्याचा दावा

    नाशिकमधील गाजलेल्या टीसीएस-संबंधित महिला शोषण आणि कथित धर्मांतर प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. विशेष तपास पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात पीडित महिलेने गंभीर आरोप केले असून, तिला विशिष्ट धर्म स्वीकारण्यासाठी मानसिकरीत्या प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रक्रियेत वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक यांच्यासह इतर धर्मप्रचारकांचे व्हिडिओ दाखवले जात असल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

    Read more

    Nashik TCS Case : ‘हे धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित कट; नाशिक TCS प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत आरोप

    नाशिक TCS मधले हे केवळ धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित डाव आहे,” असा गंभीर आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशाची सद्सद्वविवेकबुद्धी हादरल्याचा उल्लेखही या याचिकेत करण्यात आलाय. नाशिक TCS प्रकरणाने देशभर हलकल्लोळ माजवला आहे. हे सक्तीचे किंवा फसवणुकीने होणारे धर्मांतर ही केवळ धार्मिक बाब नसून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे, असे सांगणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

    Read more

    Nashik TCS Case : नाशिक TCS कांड; शाहरुखची पत्नी म्हणाली- ते सहकाऱ्यांची फक्त थट्टा-मस्करी करायचे

    देशभर चर्चेत राहिलेल्या नाशिक TCS कांडात आता आणखी एक बाजू समोर आलीय. या प्रकरणातला संशयित आरोपी शाहरुखची पत्नी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. तिने सर्व आरोप फेटाळले. धर्मांतरासारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. सोबतच शाहरुख सहकाऱ्यांशी फक्त थट्टा-मस्करी करायचा. त्याला केलेली अटक, पुरावे या साऱ्यांवरच तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून, एचआर मॅनेजर निदा खान अद्यापही फरार असल्याचे समजते.

    Read more