• Download App
    नाशकात अजितदादांच्या स्वागताच्या बॅनर वरून शरद पवार "आऊट"; "सत्तामार्गी" यशवंतराव "इन"!! Nashik Ajit pawar on welcome Banner Sharad Pawar not available

    नाशकात अजितदादांच्या स्वागताच्या बॅनर वरून शरद पवार “आऊट”; “सत्तामार्गी” यशवंतराव “इन”!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शिंदे – फडणवीस सरकार मधले दुसरे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आले, तेव्हा त्यांच्या स्वागत बॅनर वरून शरद पवार “आऊट” झालेले दिसले, तर “सत्तामार्गी” यशवंतराव चव्हाण मात्र कार्यकर्त्यांनी पोस्टरवर “इन” केले. शिंदे – फडणवीस सरकार मधल्या अजितदादांच्या एन्ट्रीला साजसे असेच हे पोस्टर ठरले!! Nashik Ajit pawar on welcome Banner Sharad Pawar not available

    कोणत्याही मार्गाने का होई ना, पण सत्तेला चिकटून राहिले पाहिजे किंवा सत्तेच्या वळचणीला जाऊन राहिले पाहिजे, ही यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आयुष्यभराच्या राजकीय कृतीतून कार्यकर्त्यांना दिलेली शिकवण आहे. यशवंतराव कायमच काँग्रेसमध्ये आणि काँग्रेस बाहेर राहून सत्तेचेच राजकारण करत राहिले होते. राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी इंदिरा गांधी पुढे शरणागती पत्करली आणि ते आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून सत्तेच्या वळचणीलाच राहिले होते.



    अजित पवार देखील विरोधी बाकांवर बसण्याऐवजी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. “यशवंत मार्गा”ने ते सत्तेवर गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यातली सूचकता ओळखत यशवंतराव चव्हाण यांचे फोटो अजितदादांच्या स्वागत बॅनरवर लावले, पण त्याच वेळी त्यांनी अजितदादांच्या पोस्टरवरून शरद पवारांचा फोटो हटवून टाकला.

    तसेही राष्ट्रवादीत फूट पडली आहे की नाही याविषयी आत्तापर्यंत कार्यकर्त्यांसमोर संभ्रम निर्माण करून पुढे चाललेल्या शरद पवारांना अखेर निवडणूक आयोगात अजितदादांविरुद्ध थेट कायदेशीर भूमिका घ्यावी लागली. तोपर्यंत त्यांनी माझा फोटो पोस्टर – बॅनर्सवर वापरू नका, असे अजितदादा गटाला इशारे देऊन बघितले. पण अजितदादा गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून शरद पवारांचा फोटो पोस्टर आणि बॅनरवर वापरणे सुरूच ठेवले होते.

    पण नाशिकमध्ये मात्र कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगातील कायदेशीर लढाईचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवारांच्या स्वागताच्या पोस्टरवरून शरद पवारांचे फोटो हटविले आणि त्यांच्या ऐवजी यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावले.

    Nashik Ajit pawar on welcome Banner Sharad Pawar not available

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस