प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने काय संन्याशांवर छापे घातलेत का? भ्रष्टाचाऱ्यांवरच छापे घातले आहेत ना!!, अशा परखड शब्दांमध्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.Narayan Rane targets ncp over ed raids
राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक मंत्र्यांवर छापेमारी झाली आहे. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर देखील छापेमारी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ईडीने छापे घातले ते काय संन्याशी आहेत का? त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणूनच छापे घातले आहेत. एकेक करून आता त्यांचे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत. त्यांना त्याची किंमत चुकवावीच लागेल, असे नारायण राणे म्हणाले आहेत. सिंधुदुर्ग मध्ये ते जाहीर सभेत बोलत होते.
त्याच वेळी त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे नेहमी लावालाव्या करत असतात म्हणूनच त्यांचे नाव “संजय” असावे, असा टोला लगावला आहे. राऊत जसे वरवर दाखवतात, ते तसे नाहीत. ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की राष्ट्रवादीचे?, असा खडा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्ष महापालिका निवडणुकीला घाबरत आहेत. कोणत्याच महापालिकेत त्यांची सत्ता येणार नाही आणि मुंबईतली सत्ता शिवसेना गमावेल याची त्यांना खात्री आहे म्हणूनच ते निवडणुका टाळत आहेत, असे टीकास्त्र देखील नारायण राणे सोडले आहे.
राणे म्हणाले की, ‘संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? हेच समजत नाहीत. संजय राऊत जसं दाखवतात तसे नाहीत. लावालावी करतात त्यामुळेच त्यांचे नाव संजय राऊत आहे.’ देशात सत्ता असताना भाजपने ऐक्य कधीच तोडले नाही, असेही राणे म्हणाले. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का? सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होते, असे मत राणे यांनी यावेळी व्यक्त केले.
संसदेत बोलताना अडखळल्यानंतर ट्रोल झालेले राणे यांनी त्यावरही उत्तर दिलं. ते म्हणाले की, मला प्रश्न समाजाला होता, अध्यक्ष्यांना वाटलं तो प्रश्न समजला नसेल असा वाटलं म्हणून अध्यक्षनी तो पुन्हा सांगितला. जे काही करायचे आहे ते करा.. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगासंदर्भात माहिती दिली. भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे काम सुरू आहे. अधिवेशनमध्ये कायदे करणारी बिल पास होत आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे, असेही राणे म्हणाले.
तीन पक्षांना निवडणूक नको आहे. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचे काम सुरू आहे. मुंबई महापालिकेत दिसेल असे काम करू, असे राणे म्हणाले. मला 55 वर्ष राजकारणात झाली त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता बदल होईलच. पण पत्रकारांना निवडणुकीचे प्लॅन सांगून सुरुंग लावायचं नाही त्यामुळे सांगणार नाही, असेही त्यांनी सांगितल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21, 22, 23 जानेवारी रोजी उद्योगाच्या अनेक योजनांच्या घोषणा केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येणार आहेत. केरळच्या धर्तीवर सगळ्या योजना कोकणात आणणार आहे, असे राणे यांनी सांगितले.
Narayan Rane targets ncp over ed raids
महत्त्वाच्या बातम्या
- चिंताजनक : मुलींवर होणाऱ्या लैगिंक अत्याचाराच्या आणि शोषणनाच्या घटनेत वाढ
- लावालावी करतात म्हणून राऊतांचे नाव “संजय” असावे, पण ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?, नारायण राणेंचा टोला
- उत्तर प्रदेशला “योगी” नव्हे “योग्य” सरकारची गरज; अखिलेश यांची टोलेबाजी!!; समाजवादीच्या विकास कामांवर भाजपच्या उड्या!!
- वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याप्रकरणी भाजप नेत्याविरुद्धच एफआयआर; नवाब मलिक यांचा सोमय्यांवर पलटवार