• Download App
    काँग्रेस स्वतंत्र लढण्याची घोषणा करताना नानांनी काढली खंजीर खुपसण्याची आठवण Nana patople remembers political backstabbing in maharashtra

    काँग्रेस स्वतंत्र लढण्याची घोषणा करताना नानांनी काढली खंजीर खुपसण्याची आठवण

    प्रतिनिधी

    मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सगळे काही आलबेल असल्याची भाषा एकीकडे वापरली जात असताना दुसरीकडे आघाडीतील तीनही पक्षांनी वेगवेगळ्या चुली कायम राखल्या आहेत. काँग्रेसने तर पहिल्यापासूनच निवडणूका स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. आज त्याच घोषणेचा पुनरूच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पण तो करतानाच त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासातील खंजीर खुपसण्याच्या घटनेची देखील विशेषत्वाने आठवण काढली. Nana patople remembers political backstabbing in maharashtra

    नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, की “आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचे आमचे धोरण जाहीर केले आहे. समजा आम्ही निवडणूका लढविण्यात देखील सोबत आहोत असे म्हटले आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असे सांगितले, तर ते मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत.”



    नाना पटोले यांच्या विधानातली ही खोचकता कोणाच्या दिशेने आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आधी एकत्र लढतो म्हणायचे. मित्र पक्षाला गाफील ठेवायचे आणि नंतर स्वतंत्र लढून मित्र पक्षालाच पराभूत करायचे हे धोरण ज्येष्ठ नेते शरद पवारांचे राहिले आहे, असेच सूचकपणे नाना पटोले यांनी पवारांचे नाव न घेता सांगून टाकले.

    पुढची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेशी युती करून लढवेल, अशी घोषणा शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात केली आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंचे राजकीय विधान महत्त्वाचे आहे.

    Nana patople remembers political backstabbing in maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!