प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस ही जमीनदाराच्या नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी म्हणणाऱ्या शरद पवारांना नाना पटोलेंनी एक दिवस उलटून गेल्यावर प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिली होती. परंतु त्यांनीच तिच्यावर डल्ला मारला. ती चोरली, असा घणाघाती प्रतिहल्ला नाना पटोले यांनी केला.Nana patole targets sharad pawar over his remarks on Congress
शरद पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्याबाबत विविध प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. पण काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया सगळ्यात उशीरा अली आहे.
काँग्रेसकडून देखील शरद पवारांच्या या विधानावर प्रत्युत्तर दिले गेले आहे.पण एक दिवस उलटून गेल्या नंतर…!! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत, शरद पवारांवर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. ते म्हणाले, की त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असे वाटते की दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या नाही गेल्या पाहिजेत.
असं मोठ्या व्यक्तिमत्वाला आम्ही लहान व्यक्ती सांगू शकतो. काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. काँग्रेस हा काही जमीनदाराचा पक्ष नाही. ज्या लोकांना काँग्रेसने पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, हे सातत्याने देशभरातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.” असे नाना पटोले टीव्ही -9 शी बोलताना म्हणाले.
सामान्य जनता आजही काँग्रेस सोबत आहे. देशामध्ये भाजपाला एकच पर्याय तो म्हणजे काँग्रेसचा आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण या पद्धतीच्या प्रतिक्रिया देऊन काँग्रेस नेतृत्वाच्या खच्चीकरणाचा जो प्रयत्न केला जातो. हे आता कदापि कुणी मान्य करत नाही, काँग्रेस नेतृत्वच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होईल.” असेही पटोले यांनी यावेळी बोलून दाखवले.
शरद पवार हे मोठे आहेत, त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही असेच ठरले आहे. परंतु, पक्षाबाबत त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे. खरंतर काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिलेली होती आणि जमीन राखणाऱ्या लोकांनीच जमीन चोरली, डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती आज झालेली असेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार –
“आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते.
विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असे ते म्हणतात. काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.” असं देखील म्हणाले होते.
Nana patole targets sharad pawar over his remarks on Congress
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाचा दहा चौरस किमी परिसर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित, मांस आणि मद्यविक्रीवर बंदी
- स्पेनमध्ये धार्मिक सौहार्दाचे उदाहरण, गणपती बाप्पाची मिरवणूक चर्चमध्ये दाखल, विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला व्हिडिओ
- ममता सरकारच्या छळ आणि धमक्यांमुळे पत्रकाराचा बंगाल सोडून दिल्लीत आश्रय, नुपूर शर्मा यांनी व्यक्त केल्या वेदना
- काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा गंभीर आरोप, म्हणाले- यूपी निवडणुकीत केंद्र सरकार अफगाणिस्तान संकटाचा फायदा घेणार!