नाशिक : महाराष्ट्रातल्या विधानसभा आणि विधान परिषद मिळून सर्व आमदारांच्या स्थानिक विकास निधीत ठाकरे – पवार सरकारने दसऱ्याचा मुहूर्त साधत भरघोस वाढ केली आहे. पण हे दसऱ्याचा “मुहूर्त” साधणे आहे, की येणाऱ्या 18 महापालिकांच्या निवडणुकीचे “टाइमिंग” साधणे आहे?, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. MVA is eyeing on municipal elections while increasing MLA and MLC’s Money for their constituency
आमदारांच्या निधी वाटपाच्या मुद्यावरुन सर्वाधिक तक्रारी उघडपणे शिवसेनेच्या आमदारांनी केल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना निधी देताना हात आखडता घेतात, अशा तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत नेल्या आहेत आणि त्याची जाहीर वाच्यता देखील केली आहे. मराठवाड्यातल्या आमदारांची प्रामुख्याने या तक्रारी आहेत.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आमदारांच्या स्थानिक विकास निधीत सरसकट एक कोटी रुपयांची वाढ करून एकूण आमदार निधी चार कोटी रुपयांचा केला आहे. त्यामुळे प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी दर वर्षी चार कोटी रुपयांचा निधी मिळेल. सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी याचा 1400 कोटींचा बोजा पडेल, असे सांगण्यात येते.
खुशखबर ! ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग होणार लागू
2022 च्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या 18 महापालिकांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर आमदारांच्या निधीत वाढ करून “त्यांच्या विकासाची वाट” मोकळी केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सध्या विधानसभा आणि विधान परिषदेतील संख्येचे बळ लक्षात घेता राजकीय पक्ष म्हणून भाजप जरी पहिल्या नंबरवर असला तरी महाविकास आघाडी मधील तीन पक्षांच्या आमदारांची एकत्रित बेरीज जास्त भरते. या आमदारांना वाढीव निधी मिळणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम स्थानिक विकासकामांच्या दृष्टीने साधता आला तर त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मनसुबा दिसतो आहे.
शिवाय आमदारांच्या निधीमध्ये वाढीची ही फक्त घोषणा आहे. प्रत्यक्ष निधी वाटप सुरू व्हायचे आहे. ते वाटप “नेमके” कसे होते?? कोणाला झुकते माप मिळते??, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे आमदार निधीत भरघोस वाढ करताना ठाकरे – पवार सरकारने उद्याच्या दसऱ्याचा “मुहूर्त” जरी निवडला असला, तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या 18 महापालिकांच्या निवडणुकीचे “टाइमिंग” साधण्याचा हा ठाकरे – पवार सरकारचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात सटीक चर्चा आहे.
MVA is eyeing on municipal elections while increasing MLA and MLC’s Money for their constituency
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसाहाय्य देणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
- तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा मृत्यू, 79 जण गंभीर भाजले; 14 जणांची प्रकृती चिंताजनक
- सर्वसामान्यांना घाऊक महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा! सप्टेंबरमध्ये दर पोहोचले 10.66 टक्क्यांवर
- The Focus India Explainer : केंद्राने BSFचे अधिकार क्षेत्र का वाढवले? काय आहेत कारणे? वाचा सविस्तर…
- जगातली पहिल्या महामारी प्रूफ इमारतीची निर्मिती सुरू, तब्बल 500 मिलियन डॉलर खर्चून बांधली जातेय 55 मजली इमारत