• Download App
    मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबईची केली तुंबई; आज दिवसभरही मुसळधार पावसाचा इशारा। Mumbai: Water-logging at Mumbai's Gandhi Market area as the city continues to receive heavy rainfall

    मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबईची केली तुंबई; आज दिवसभरही मुसळधार पावसाचा इशारा

    वृत्तसंस्था

    मुंबई : मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसाने मुंबई महापालिकेच्या पावसाळ्याच्या तयारीची पुरती पोलखोल केली आहे. मुंबईची तुंबई करून टाकली आहे. आज दिवसभरही हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. Mumbai: Water-logging at Mumbai’s Gandhi Market area as the city continues to receive heavy rainfall

    गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने रायगड, तळकोकणाला झोडपून काढल्यानंतर मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी अतितीव्र पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    सायन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साचून लोकल वाहतूकीला फटका बसला आहे. कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक २०- २५ मिनिटे उशीराने होत आहे.

    कोकणात सिंधुदुर्ग तिलारी धरण क्षेत्रातील कॉजवे पाण्याखाली; पाच गावाचा संपर्क तुटला, पुरस्थिती कायम आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये अनेक नद्यांना पूर आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरीतही पावसाची संततधार सुरूच आहे.

    Mumbai: Water-logging at Mumbai’s Gandhi Market area as the city continues to receive heavy rainfall

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, हॉटेलमधील नगरसेवकांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा

    Sangeeta Thombare : बीडमध्ये शरद पवार गटाला धक्का; माजी आमदार संगीता ठोंबरेंचा शिवसेनेत प्रवेश, केज मतदारसंघात शिंदे गटाची ताकद वाढणार

    Narayan Rane : उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत:त्यांच्या बोलण्यात वास्तव नाही, महापौर पदाच्या विधानावरुन नारायण राणेंची टीका