लवकरात लवकर पावले न उचलल्यास तेथील रहिवाशांच्या जीवितास धोका संभावेल.म्हणून या चाळींच्या पुनर्विकासासाठी शिवसेनेने केंद्र सरकारकडे जोरदार आग्रह धरला आहे.Mumbai: Redevelop LIC’s land plots; Shiv Sena urges central government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण मुंबईत गिरगाव येथे एलआयसीच्या जमिनीवर आंग्रेवाडी चाळ, बदामवाडी, देवकरण नाणजी या 100 वर्षांहून जुन्या चाळी आहेत. दरम्यान या चाळी १०० वर्षांपेक्षा जास्त जुन्या असल्याने त्या इतक्या मोडकळीस आल्या आहेत की कधीही जमीनदोस्त होतील.त्यामुळे तेथील रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत.
लवकरात लवकर पावले न उचलल्यास तेथील रहिवाशांच्या जीवितास धोका संभावेल.म्हणून या चाळींच्या पुनर्विकासासाठी शिवसेनेने केंद्र सरकारकडे जोरदार आग्रह धरला आहे.शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले.
या चाळींचा पुनर्विकास एलआयसीने करावा किंवा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला (म्हाडा) पुनर्विकास योजना राबविण्याची परवानगी द्यावी,अशी विनंती अरविंद सावंत यांनी या निवेदनात केली आहे.या निवेदनावर डॉ. कराड यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आणि लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती खासदार सावंत यांनी दिली.
Mumbai : Redevelop LIC’s land plots; Shiv Sena urges central government
महत्त्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशन : विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही आपलं मानता का; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- विज्ञानाची गुपिते : अवघ्या ९२ मिनिटांत अंतराळस्थानक घालते साऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता अशीही होईल वीजनिर्मिती
- चिनी ड्रॅगनला कोंडीत पकडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न, मित्र देशांना भरघोस मदत करणार