• Download App
    ठाकरे सरकारजा मुंबई पॅटर्न, मुंबईतील रुग्ण दाखविले जातात पुण्यात, नितेश राणे यांचा आरोप|Mumbai pattern, patients from Mumbai are shown in Pune, allegation of Nitesh Rane

    ठाकरे सरकारचा ‘मुंबई पॅटर्न’; मुंबईतील रुग्ण दाखविले जातात पुण्यात! नितेश राणेंचा आरोप

    ठाकरे सरकराचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा आहे. मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.Mumbai pattern, patients from Mumbai are shown in Pune, allegation of Nitesh Rane


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: ठाकरे सरकराचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा आहे. मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

    नितेश राणे यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच मुंबई पॅटर्न आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे.



    मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत आहे.

    राणे म्हणाले, कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसºया शहरात हलवले जात नाही. केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते.

    त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त राहतो.मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी कोरोना रुग्णांसाठी केलेल्या कामाची देशभर दखल घेतली जात आहे.

    सर्वोच्च न्यायालयानेही चहल यांचे मॉडेल इतर शहरांनी वापरावे, असे सांगितले होते. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होत आहे. मात्र, राणे यांनी केलेल्या आरोपामुळे मुंबईतील कोरोना मुक्तीच्या मॉडलसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    Mumbai pattern, patients from Mumbai are shown in Pune, allegation of Nitesh Rane

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस