• Download App
    मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी शरद पवार मैदानात; विरोधात धनंजय शिंदे । mumbai marathi granthsangrahalay presidential election, sharad pawar is contesting

    मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी शरद पवार मैदानात; विरोधात धनंजय शिंदे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होत असून या निवडणुकीत शरद पवार यांच्या सहित 16 उमेदवारांना मतदानाचा अधिकार नाही. मात्र, त्यामुळे ही निवडणूक कोणत्या नियमाखाली घेतली जात आहे, असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. mumbai marathi granthsangrahalay presidential election, sharad pawar is contesting

    शरद पवार यांच्या विरोधात धनंजय शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. आज होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर इथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही साखर कारखान्याची, बँकांची निवडणूक नाही. सरस्वतीच्या संस्थेत गैरकारभार सुरू आहे, ही दंडेलशाही आहे या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे. तर, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उमेदवार विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांचे खंडण केले आहेत. पवारांवर आरोप केले की प्रसिद्धी मिळते हे काही जणांना माहिती आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या बाबत करण्यात आलेल्या आरोपाला उत्तर देणार असल्याचे विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. टीव्ही ९ मराठीने ही बातमी दिली आहे.



    मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव समितीतर्फे या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी धनंजय शिंदे, उपाध्यक्ष पदासाठी डॉ संजय भिडे, प्रमोद खानोलकर, सुधीर सावंत, झुंझार पाटील, डॉ.रजनी जाधव, अनिल गलगली, आनंद प्रभू, संतोष कदम हे शरद पवार गटाविरोधात उभे आहेत.

    दुसरीकडे मुंबई मराठी संग्रहालयाच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. एकूण सात उपाध्यक्षपदांसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर, शशी प्रभू, रामदास फुटाणे, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत हे प्रमुख दावेदार आहेत. डॉ. भालचंद्र मुणगेकर वगळता इतरांची नेमणूक शरद पवार यांच्या सूचनेनुसार 2017पासून झाली असून याबाबत अनिल गलगली यांनी केलेल्या तक्रारी अजून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहे.

    शरद पवार यांच्यासह पासून कोणीही यापूर्वी संग्रहालयाच्या निवडणूकीचा अर्जही भरला नव्हता. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच या निवडणुकीत धनंजय शिंदे यांनी आव्हान उभे केले आहे.

    mumbai marathi granthsangrahalay presidential election, sharad pawar is contesting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    435 कोटी थकबाकीच्या कारखान्याच्या गोडाऊनला बँकेने ठोकले सील; पवार समर्थकांनी त्याचा संबंध जोडला पवारांच्या सभेशी!!