• Download App
    सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी मुंबईतल्या तरुणाने टाकला आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांनी केली अटक । Mumbai man held for posts video of committing suicide using edit tools on social media To increase followers

    सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी मुंबईतल्या तरुणाने टाकला रेल्वेखाली आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांनी केली अटक

    suicide using edit tools on social media : सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुणाई काहीही करायला तयार होते. मुंबईमधील एका तरुणाने सॉफ्टवेयर आणि स्पेशल इफेक्ट्सचा वापरून आत्महत्येचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोडही केला. परंतु यानंतर त्याला आत्महत्येसारख्या कृत्यास प्रमोट केल्याबद्दल या मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. इरफान खान असे या तरुणाचे नाव असून तो अवघ्या 20 वर्षांचा आहे. त्याने इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी रेल्वे रुळावर बसून वेगवान ट्रेनच्या खाली येऊन आत्महत्या केल्याचा एक व्हिडिओ बनविला होता. Mumbai man held for posts video of committing suicide using edit tools on social media To increase followers


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुणाई काहीही करायला तयार होते. मुंबईमधील एका तरुणाने सॉफ्टवेयर आणि स्पेशल इफेक्ट्सचा वापरून आत्महत्येचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोडही केला. परंतु यानंतर त्याला आत्महत्येसारख्या कृत्यास प्रमोट केल्याबद्दल या मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. इरफान खान असे या तरुणाचे नाव असून तो अवघ्या 20 वर्षांचा आहे. त्याने इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी रेल्वे रुळावर बसून वेगवान ट्रेनच्या खाली येऊन आत्महत्या केल्याचा एक व्हिडिओ बनविला होता.

    ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, इरफान खान हा विलेपार्ले पश्चिममधील रहिवासी आहे. तर त्याचा व्हिडिओ वांद्रे आणि खार स्थानकादरम्यान चित्रित करण्यात आला आहे. या व्हिडिओत इरफान एका प्रेमभंग झालेल्या तरुणाचा अभिनय करताना दिसत आहे. प्रेमभंगाचे दुःख घेऊन इरफान रेल्वे रुळावर बसला असून, एका भरधाव ट्रेनखाली तो येतो, असे त्या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. इरफानने सॉफ्टवेयर आणि स्पेशल इफेक्टचा वापर करून ट्रेनसमोर आत्महत्येचा व्हिडिओ तयार केला.

    मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त खालिद म्हणाले की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या पथकाने आरोपी इरफानचा शोध घेतला व त्याला अटक करण्यात आली. डीसीपी प्रदीप चव्हाण म्हणाले की, आरोपी इरफानविरोधात भादंवि कलम 188, 336 आणि 505 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह त्याच्याविरुद्ध भारतीय रेल्वे कायद्याचे कलम 145 आणि 147 देखील लागू करण्यात आले आहे. आरोपी इरफानने सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी असा व्हिडिओ बनवला होता, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

    इरफानने आता आणखी एक व्हिडिओ पब्लिश केला असून खुलासा केला आहे. तो म्हणाला, याद्वारे कोणालाही आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा त्याचा हेतू नव्हता. त्याने असा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि म्हणाला की, या व्हिडिओचा दुसरा भागही येत होता, ज्यामध्ये तो स्वप्नातून उठून आपल्या आई आणि वडिलांबरोबर आनंदी आहे, असे दाखविले जाणार होते.

    Mumbai man held for posts video of committing suicide using edit tools on social media To increase followers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या माढा मोहिमेनंतर फडणवीसांची स्वारी; फेरमांडणी करून “मोदी है तो मुमकिन है” ची कसून पूर्वतयारी!!

    हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मार्क-2 क्षेपणास्त्राचा संरक्षण ताफ्यात समावेश

    कुकी दहशतवद्यांना मणिपूरमध्ये CRPF कॅम्पला केले लक्ष्य ; बॉम्ब फेकले, दोन जवान शहीद