• Download App
    MUMBAI : दादर स्थानकाचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी ; नामांतरसाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम । MUMBAI: Demand for renaming of Dadar station as Dr. Babasaheb Ambedkar Terminus; Online signature campaign for renaming

    MUMBAI : दादर स्थानकाचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी ; नामांतरसाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम

    कोरोना महामारिमुळे अनुयायांनी गर्दी न करता चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्यावतीनं करण्यात आल आहे. MUMBAI: Demand for renaming of Dadar station as Dr. Babasaheb Ambedkar Terminus; Online signature campaign for renaming


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आज ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यामुळे आज दादरच्या चौत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.परंतु कोरोना महामारिमुळे अनुयायांनी गर्दी न करता चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्यावतीनं करण्यात आल आहे.

    याच पार्श्वभूमीवर दादर स्थानकाचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी गेली.ही मागणी अनेक वर्षे झालं सुरू आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.



    दादरमध्ये चैत्यभूमी आहे, राजगृह आहे त्या दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्याचेच नाव असावे, अशी मागणी विद्यार्थी भारती संघटनेने केली आहे.दर वर्षी ६ डिसेंबर रोजी संघटना याच मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवते.

    मात्र याची दखल अद्यापही सरकारने घेतली नसल्याने याच मागणीसाठी संघटना यंदाही स्वाक्षरी मोहीम राबविणार आहे. दरम्यान या मागणीला अजून बळ देण्यासाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहिमही संघटनेने सुरू केली आहे. अनुयायांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे संस्थापक किशोर दादा गणाई यांनी केले आहे.

    MUMBAI : Demand for renaming of Dadar station as Dr. Babasaheb Ambedkar Terminus; Online signature campaign for renaming

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!