• Download App
    Mumbai BMC Voter List 11 Lakh Duplicate Names Draft List MNS Shiv Sena Photos Videos Report मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख मतदारांची दुबार नावे;

    Mumbai BMC : मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख मतदारांची दुबार नावे; प्रारूप मतदार यादी जाहीर

    Mumbai BMC

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Mumbai BMC बहुप्रतीक्षित मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मतदार यादीतील घोळ आता गंभीर पातळीवर पोहोचला आहे. नुकत्याच २० नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये तब्बल ११ लाख दुबार मतदारांची नावे असल्याची बाब समोर आली आहे. काही मतदारांची नावे चक्क १०३ वेळा नोंदवली गेल्याचेही यादीतून दिसून येते.Mumbai BMC

    मुंबईच्या एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदारांपैकी ४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे बोगस मतदारांची संख्या ११ लाखांवर पोहोचली आहे. मतदार यादीतील या महाघोटाळ्यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे. यादीतील त्रुटींवर ठाकरे गट शिवसेना आणि मनसेकडून वारंवार आक्षेप घेतले जात असताना, प्रशासनाने सुरुवातीला हे आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, एकाच व्यक्तीचे नाव १०३ वेळा नोंदवल्याचे सिद्ध झाल्याने प्रशासनाच्या या दाव्यातील हवा निघून गेली आहे. या मोठ्या घोळानंतर ११ लाखांहून अधिक दुबार नावांना वगळण्यासाठी बीएमसी प्रशासनाने तातडीने २३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली आहे.Mumbai BMC



    हरकती नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख

    मतदारांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. ५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप यादीत जे मतदार दुबार नोंदले गेले आहेत, त्यांची नावे चिन्हांकित करण्यात आली आहेत. त्यांना स्वतःहून अतिरिक्त नावे वगळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी दुबार नोंदणी आढळल्यास त्या मतदाराकडून ‘अन्यत्र मतदान केले नसल्याचे’ प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे.

    Mumbai BMC Voter List 11 Lakh Duplicate Names Draft List MNS Shiv Sena Photos Videos Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr Gauri Palve-Garje : पालवे कुटुंबीयांचा गंभीर आरोप- गौरीची हत्याच; लेकीला न्याय मिळावा, सीबीआय चौकशीची मागणी

    जामखेड मध्ये निधी आला प्रचंड, पण एकमेकांचे पाय खेचण्याच्या नादात जनतेचे नुकसान; एकनाथ शिंदेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल

    छत्रपती संभाजीनगरातील महिलेचा अफगाणी बॉयफ्रेंड, पाक कनेक्शन आणि 32 लाखांचा मागोवा; फाइव्ह स्टारमध्ये राहण्याचे गूढ