स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावे आणि मग काय तो निर्णय घ्यावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना कोणत्याही लढाईसाठी कायम तयार असल्याचंही ते पत्रकारांना म्हणाले. विरोधकांच्या पोटदुखीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल वर्धापन दिनानिमित्त बोलताना औषध दिलं आहे, ते औषध परिणामकारक ठरेल, अशी आशाही संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केली. MP Sanjay Raut Criticizes Congress On Elections on their own Today
विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावे आणि मग काय तो निर्णय घ्यावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना कोणत्याही लढाईसाठी कायम तयार असल्याचंही ते पत्रकारांना म्हणाले. विरोधकांच्या पोटदुखीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल वर्धापन दिनानिमित्त बोलताना औषध दिलं आहे, ते औषध परिणामकारक ठरेल, अशी आशाही संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केली.
संजय राऊत म्हणाले की, कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ हीच शिवसेनेची भूमिका आहे. राज्यात शांतता नांदायची असेल तर प्रत्येकानं आपली भूमिका ओळखली पाहिजे, असंही ते म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना संजय राऊत म्हणाले की, “भ्रम राहता कामा नये. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्या पक्षातील एक नेता स्वबळाची भाषा करतो आणि दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. त्यामुळे त्या सगळ्यांनी आधी त्या गोंधळातून बाहेर यावं, त्यानंतर स्वबळ वैगरे काय आहे, त्यासंदर्भात निर्णय घ्यावा. पण शिवसेनेविषयी म्हणाल तर शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल महाराष्ट्रातील जनतेला, लाखो शिवसैनिकांना ही दिशा दिली आहे, त्यानुसार शिवसेना कोणत्याही लढाईस कायम तयार आहे. स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर…”
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसकडून सातत्याने स्वबळाचा नारा दिला जात आहे. यावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते म्हणाले की, अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळातसुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
MP Sanjay Raut Criticizes Congress On Elections on their own Today
महत्त्वाच्या बातम्या
- सोनिया गांधी देश की बहू, गांधींशिवाय देश चालू शकत नाही – शत्रुघ्न सिन्हा
- 4 जुलैला सोलापुरात मराठा मोर्चा; परवानगी नाकारली तरी काढणारच, नरेंद्र पाटील आक्रमक
- मराठा आरक्षण : राज्य सरकारआधी विनोद पाटलांकडूनच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल
- Pratap Sarnaik Letter : काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेना कमकुवत, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचे उद्धव ठाकरेंना पत्र
- काश्मिरातल्या निवडणुकांच्या हालचालींमुळे पाकिस्तानचा तिळपापड, कुरैशी म्हणाले- भारताच्या कोणत्याही निर्णयाचा विरोध करू