विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील महिलांनी रणचंडीचा अवतार धारण केला. मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी 13 वर्षांच्या मुलीच्या खुन्याला न्यायालयातच चोप दिला.बिबवेवाडीमधील 13 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा एकतर्फी प्रेमामधून खून केलेल्या आरोपीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आवारात चोप दिला.MNS, Congress and NCP women office bearers in Pune beat 13-year-old girl’s killer in court
शहरातील मुली आणि महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना कधी निर्माण होणार असा सवाल देखील या महिलांनी पोलिसांना केला.ऋषिकेश ऊर्फ शुभम बाजीराव भागवत याला मुलीच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपीला आज न्यायालयामध्ये आणले होते.
या आरोपीला अद्दल घडविण्याकरिता मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे, काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकारी संगीता तिवारी, राष्ट्रवादीच्या ऍड. श्रुती गायकवाड, भक्ती कुंभार, मनसेच्या मनीषा कावेडीया, लावण्या शिंदे, वंदना साळवी, प्रियांका मधाले, किरण सातपुते, दीपाली बेगमपूरे यांनी न्यायालय गाठले.
या सर्व पक्षीय महिलांनी त्याला ताब्यात देण्याची विनंती पोलिसांकडे केली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला या महिलांनी चांगलाच चोप दिला. पुण्यातील महिलांच्या आणि मुलींच्या नादी लागाल तर गाठ आमच्याशी आहे असा संदेश या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला. घाबरलेला आरोपी पोलिसांच्या मदतीने कसाबसा परत न्यायालयात जाऊन लपून बसला.
महिला सुरक्षेबाबत बुधवारी दुपारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तां यांची भेट घेण्यात येणार असून रस्त्यांवर आणि चौकाचौकात बसणारी टोळकी बंद करा अशी मागणी केली जाणार आहे. मुलींच्या अंडी महिलांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढविण्याची विनंती केली जाणार असल्याचे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी संगितले.
MNS, Congress and NCP women office bearers in Pune beat 13-year-old girl’s killer in court
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप उभा करेल सिल्वासात उभा छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा
- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात उचलले मोठे पाऊल , 50 कोटींचा मानहानीचा दाखल केला खटला
- भारताने कोरोना लसीकरणात 99 कोटींचा टप्पा गाठला, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया यांनी ट्विटरवरून दिली माहिती
- ‘टार्गेट किलींग ‘ प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला, एजन्सी करेल पाकिस्तानचा पर्दाफाश
- CONGRESS : नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी ; दहा वर्षांपासून प्रवक्ते असणारे सचिन सावंत यांचा राजीनामा