विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र असो की अन्य कुठले राज्य, मुली-महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असेल तर ते चिंताजनकच आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार श्रीमती सुप्रिया सुळे व त्यांच्याच गोटातील काही मंडळींनी अशा थाटात हा विषय मांडला, की जणू काही राज्य सरकार बदलले आणि मुली बेपत्ता व्हायला लागल्या!!, अशी घणाघाती टीका भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांनी केली आहे. Vijaya Rahatkar says, Missing girls are serious issue; but don’t policitise
विजयाताई महाराष्ट्रात महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी अनेक संवेदनशील विषय हाताळले आहेत, त्यामुळे मुली बेपत्ता होण्याच्या विषयाचे गांभीर्य ओळखून त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यावर भाष्य केले आहे.
यात विजयाताई म्हणतात :
- अति काळजीचा आणण्यापूर्वी मुख्य विषय समजून घ्या. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 4000 मुली आणि 64,000 महिला बेपत्ता होतात. अगदी महाविकास आघाडीचे सरकार असले तरीही…
- 2020 मध्ये 4517 मुली आणि 63,252 महिला बेपत्ता झाल्या. 2021 मध्ये 3937 मुली आणि 60,435 महिला बेपत्ता झाल्या.
- आता दुसरे महत्त्वाचे म्हणजे मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात सरासरी 90 % प्रकरणात डिटेक्शन होते, तर महिलांच्या बाबतीत 75 % तपास पूर्ण होतो, म्हणजे त्या सुखरूप परत आणल्या जातात.
- तुलनाच करायची झाली तर पश्चिम बंगाल, बिहार, दिल्लीत हे प्रमाण मुलींच्या बाबतीत वर्षाला सरासरी 12 हजारांवर, तर महिलांच्या बाबतीत 64 हजारांवर आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक अल्पवयीन मुलीच्या बाबतीत एफआयआर दाखल केला जातो.
- निश्चितच ही समस्या गंभीर आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून यावर उपाय सुचविले पाहिजेत. केवळ टीकेसाठी टीका करुन प्रश्न सुटत नसतात. आरोप प्रत्यारोप करण्यासाठी राजकारणात वारेमाप संधी असते. कृपया, अशा विषयांना तरी सोडा!!
Vijaya Rahatkar says, Missing girls are serious issue; but don’t policitise
महत्वाच्या बातम्या
- 68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, याचिकाकर्त्याने म्हटले- राहुल यांना शिक्षा सुनावणाऱ्या जजचाही समावेश
- ‘द केरला स्टोरी’ तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार नाही, मल्टिप्लेक्स संघटनेचा निर्णय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दिला हवाला
- केरळमध्ये हाऊसबोट बुडाल्याने 21 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख, मृतांच्या वारसांना मदत जाहीर
- 2024 प्रजासत्ताक दिन संचलनात फक्त महिला सैनिक, अधिकारी, बँड आणि चित्ररथ हवेत; संरक्षण मंत्रालयाची ऐतिहासिक सूचना