वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात पुण्यात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. जाधव कुटुंबातील सदस्यांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. members from same family died due to coronavirus at Pune Maharashtra
आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड (वैशाली जाधव) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं. पूजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर एकामागोमाग मृत्यू झाला. यामुळे हे कुटुंबच संपलं. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पूजेच्या निमित्ताने एकत्र
जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं होतं. यानिमित्ताने सर्वजण एकत्र आले होते. एकाच कुटुंबातील सर्वजण निश्चिंत होते. मात्र कोरोनाने गाठलं. पुढे प्रकृती बिघडत गेली आणि 15 त्यांचा मृत्यू झाला.