• Download App
    Sandeep Singh Gill पवारांच्या बारामतीत गांजाची तस्करी; तब्बल ६३४ किलो गांजासह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त; ७ तस्करांना अटक!!

    पवारांच्या बारामतीत गांजाची तस्करी; तब्बल ६३४ किलो गांजासह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त; ७ तस्करांना अटक!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने विकसित केलेल्या बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग्स तस्करी वाढल्या असल्याचे दिसून येत असून पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती मध्ये धडक कारवाई करून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

    या संदर्भात कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवर ट्विट करून खुलासा केला.

    रोहित पवारांचे ट्विट असे :

    बारामतीतील गुन्हेगारी आणि ड्रग्जसंदर्भात नुकतीच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल साहेब यांची भेट घेऊन यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामतीत गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करत ६३४ किलो गांजासह ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात ७ जणांना अटक केली आहे.

    मोठे रॅकेट असण्याची शक्यता

    पोलिसांची ही कारवाई निश्चितच स्वागतार्ह आहे. पण बारामतीत वाढत असलेल्या या दोन नंबरच्या धंद्याचा पोलिसांनी अधिक सखोल तपास केला, तर आणखी खूप मोठं रॅकेट उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यापाराप्रमाणेच डोकं वर काढत असलेली गुन्हेगारीही पोलिसांनी मोडीत काढावी, ही विनंती!

    meeting was held with Police Superintendent Sandeep Singh Gill regarding crime and drugs in Baramati

    Related posts

    राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पुन्हा उकळी; पवारांच्या जखमेवर मीठ चोळी!!

    ठाण्यात वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर कलम ३०७ ची कारवाई; एकनाथ शिंदे, राज ठाकरेंचा वृद्ध व्यक्तीशी संवाद

    Mumbai Pune bomb : मुंबई-पुणे महापौर कार्यालय, RSS मुख्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ई-मेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क