विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाचे पेशंट दिवसेंदिवस दिवस वाढत असताना मुंबईसह महाराष्ट्रात कठोर निर्बंध लादण्याची ठाकरे – पवार सरकारची तयारी आहे. जनतेला महागाई सारख्या समस्येपासून दिलासा नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याऐवजी 55 हजार कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे – पवारांच्या निवडणूक तयारीच्या मात्र जोरदार बैठका सुरू आहेत.meeting of NCP ministers from Maharashtra was held by sharadd Pawar to discuss election preparations
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत बैठक घेऊन कठोर निर्बंध लावण्याची नियमावली तयार केली. लॉकडाऊन लावणार नाही पण जनतेला निर्बंध पाळावेच लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी निर्बंधांना सोबत जनतेला दिलासादायक कोणत्या गोष्टी आहेत याची वाच्यताही त्यांनी केलेली नाही. पेट्रोल – डिझेलवरचा मूल्यवर्धित कर कमी केलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 69 दिवस झाले तरी तोडगा नाही. अशा स्थितीत जनतेवर निर्बंध लादण्याची ठाकरे – पवार सरकारची तयारी आहे.
केंद्र सरकार जेव्हा निर्बंध लावते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करून काही सवलती तरी जाहीर करतात. तशी कोणतीही सवलत ठाकरे – पवार सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही.
पण त्याच वेळी दुसरीकडे महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेच्या मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि 227 शाखा प्रमुख यांची बैठक घेतली. माझ्यावरच्या वैयक्तिक टीकेला मी शांतपणे घेतो आहे. जेव्हा उत्तर द्यायचे त्याला मी उत्तर देईन. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा. विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना काढले.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेतली आहे. शिवसेना निवडणूक तयारीत मागे राहत नसेल राष्ट्रवादी काँग्रेस देखील मागे नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे. जनतेवर कठोर निर्बंध आणि राजकीय पक्ष निवडणूक तयारीसाठी मोकाट अशी आजची महाराष्ट्राची राजकीय स्थिती आहे.