• Download App
    कोल्हापूरात सर्वपक्षीय मराठा आंदोलन सुरू; एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे खासदार संभाजीराजे – चंद्रकांतदादा कोल्हापूरात आंदोलनात एकत्र Maratha agitation starts in kolhapur; MP Sambhaji raje and chandrakantdada patil on the same dias

    कोल्हापूरात सर्वपक्षीय मराठा आंदोलन सुरू; एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे खासदार संभाजीराजे – चंद्रकांतदादा कोल्हापूरात आंदोलनात एकत्र

    प्रतिनिधी

    कोल्हापूर – मराठा आरक्षणासाठी बिगर राजकीय मोर्चे काढणारे आंदोलन आता सर्वपक्षीय बनले आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या आंदोलनात आता सर्व पक्षांचे नेते दाखल झाले आहेत. Maratha agitation starts in kolhapur; MP Sambhaji raje and chandrakantdada patil on the same dias

    कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सकल मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आंदोलन सुरू झाले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्या बरोबर मालोजीराजे भोसले, हातकणंगलेचे शिवसेना खासदार खासदार धैर्यशील माने, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अॅड. प्रकाश आंबेडकर, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे हे नेते आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.



    मराठा आंदोलनावरून संभाजीराजे आणि चंद्रकांतदादा पाटील यांची राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली. संभाजीराजे हे राज्यातल्या ठाकरे – पवार सरकाराचा दोष झाकण्यासाठी सौम्य आंदोलन करीत असल्याची टीका चंद्रकांतदादांनी केली तर त्याला संभाजीराजेंनी प्रत्युत्तर दिले. आपण भाजपकडे खासदारकी मागायला गेलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती सन्मानाने दिली, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

    संभाजीराजे यांची खासदारकीची मुदत लवकरच संपत आहे. या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे आहे. त्यांनी कोल्हापूरातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारी चालविल्याचीही चर्चा आहे.

    आता आंदोलनस्थळी सर्वपक्षीय नेते एकत्र आले असताना ते काय भाषणे करतात, कोणत्या मागण्या करतात, याकडे सकल मराठा समाजाचे लक्ष आहे.

    Maratha agitation starts in kolhapur; MP Sambhaji raje and chandrakantdada patil on the same dias

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा