विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange Patil मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा अलीबाबा म्हणून केला. विजय वडेट्टीवार सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर जे काही बोलत आहेत, ते छगन भुजबळांचे शब्द आहेत. या लोकांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्यात. ओबीसींनी यावर चिंतन केले पाहिजेत. या लोकांनीच त्यांचा खरा घात केला आहे, असे ते म्हणालेत.Manoj Jarange Patil
मनोज जरांगे यांच्यावर सध्या येथील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. तिथे आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ तथा धनंजय व पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच जरांगेंना उद्देशून ओबीसीतील 375 जातींना एकदा संपवूनच टाका असे विधान केले आहे.Manoj Jarange Patil
शरद पवारांनी आमचे वाटोळे केले
याविषयी बोलताना जरांगे म्हणाले, विजय वडेट्टीवार ओबीसींच्या 375 जाती असल्याचा दावा करतात. पण त्यांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्यात. ओबीसी गरिबांनी यावर चिंतन केले पाहिजे. या लोकांनी ओबीसींना खोटे व बोगस आरक्षण दिले. हे 16 टक्के आरक्षण मराठ्यांच्या हक्काचे होते. ओबीसींचा खरा घात हा येवल्याच्या अलीबाबाने व या काँग्रेसच्या वडेट्टीवार अथवा त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नेत्यांनी केला.
मंडल आयोगाने ओबीसींना 14 टक्के आरक्षण दिले. त्यानंतर 16 टक्के आरक्षण मराठ्यांचे असल्याचे माहिती असतानाही त्यांना देण्यात आले. याचा अर्थ ओबीसींची खरी फसवणूक ही ओबीसींच्या नेत्यांनीच केली हे स्पष्ट होते. आमचे 16 टक्के आरक्षण आता आम्हाला परत मिळणार आहे. या लोकांना ज्यांनी आरक्षण दिले त्यांचेही उपकार नाहीत. शरद पवारांनी 1994 साली आमचे 16 टक्के आरक्षण देऊन आमचे वाटोळे केले. पण या लोकांनी (ओबीसी नेते) त्यांचेही (पवार) उपकार ठेवले नाही.
वडेट्टीवारांच्या तोंडी भुजबळांची भाषा
जरांगे पुढे म्हणाले, विजय वडेट्टीवार जे बोलत आहेत, ते येवल्याच्या नेत्याचे (छगन भुजबळ) शब्द आहेत. हे शब्द परळीच्या टोळीने घेतलेत. आता त्यांना एक नवीन भिडू (वडेट्टीवार) भेटला आहे. यांच्या तोंडून वदवून घेत आहेत. कारण, ते तलवार, दांडे, कोयते व बंदुकीची भाषा ही त्यांची आहे. त्यांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत. हा त्यांचा प्रयोग आहे. आम्ही तसे नाही. आम्ही गोरगरीबांना आमच्याएवढेच सांभाळतो. जीव लावतो.
ओबीसींना आमच्याविषयी थोडाही धाक नाही. कारण आम्ही उलट्या काळजाचे नाहीत. पण या लोकांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ओबीसींनाच पणाला लावले आहे. या लोकांनी ओबीसी संपवण्याचा चंग बांधला आहे, असेही जरांगे यावेळी वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले.
धाराशिवच्या व्हायरल व्हिडिओवरून मुंडेंवर टीका
धाराशिवमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात दुचाकीवरील दोनजण वाहून जात असताना ते एका विशिष्ट जातीचे असल्यामुळे त्यांना वाहून जाऊ द्या, असे काहीजण म्हणताना दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी या घटनेवर भाष्य करताना पंकजा व धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, असे म्हणणारे भावनाशून्य लोक असतील. आम्ही एवढ्या भावना सोडल्या नाहीत. आम्ही असे करूच शकत नाही. यांचेच (मुंडे) कुणीतरी असतील. यामागे वातावरण दूषित करण्याचा हेतू असेल. हे लोक असे करून त्याचा आरोप दुसऱ्यावर लोटतात. त्यामुळे त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही.
हे लोक बनाव करू शकतात. ते दुसऱ्यांना निजामाच्या औलादी म्हणतात. दुसऱ्या जिल्ह्यातील लोक आपल्या जिल्ह्यात आणून वातावरण खराब करतात. दुसऱ्यांना गुलाम समजतात. गुलामीचे गॅझेट म्हणून उल्लेख करतात. यांची काय भाषा आहे? दुसऱ्या जिल्ह्यातील पकडून आणायचा व परळीच्या टोळीने मिरवायचा असा प्रकार सध्या सुरू आहे. हा जातीयवाद आम्ही नाही तर या लोकांनी वाढवला. आम्ही अगोदर बोललो नाही. त्यांनी सुरुवात केल्यानंतर आम्ही सोडत नाहीत. आमच्या जातीला कुणी हिणवत असेल, तर आम्ही त्यांना सोडणार नाही. हे लोक खून करून आम्ही केला नाहीत. आध्यात्म असणाऱ्या ठिकाणी त्यांना आश्रय दिला जातो. जिथे माणसाचे मन शुद्धी केली जाते. तिथे काय शब्द वापरले जातात. त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा करता येत नाहीत, असे जरांगे म्हणाले.
Manoj Jarange Slams Chhagan Bhujbal as ‘Alibaba of Yeola,’ Says Bhujbal and Wadettiwar Betrayed the OBC Community
महत्वाच्या बातम्या
- Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन दिवसांत 51 जणांचा मृत्यू; 9 जण बेपत्ता; लष्कराच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू
- Diwali : दिवाळी-छठदरम्यान विमान भाडे वाढवणाऱ्यांवर कडक कारवाई; 1700 अतिरिक्त उड्डाणे असतील
- सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध
- US Government : अमेरिकेच्या अण्वस्त्रांवरही शटडाऊनचा परिणाम; ऊर्जा सचिव म्हणतात- सुरक्षा निधी 8 दिवसांपासून प्रलंबित