विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेवर तीव्र आक्षेप घेत, ती ओबीसीची नव्हे, तर जिल्ह्यावर दबाव निर्माण करण्यासाठी घेतलेली आणि मराठ्यांच्या राजकीय अस्तित्वावर घाला घालणारी सभा असल्याचे म्हटले आहे. मराठा समाज 50 ते 55 टक्के असून, ही सभा मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जीआर रद्द करण्याच्या उद्देशाने घेण्यात आली. या प्रयत्नांना तोडीस तोड उत्तर देऊन मराठ्यांनी आपली ताकद दाखवावी लागेल, असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच, त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर टीका करत, भुजबळांना वातावरण खराब करायचे असून, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले.Manoj Jarange
तुम्ही मराठ्यांना भाषणातून काय धमक्या देता?
मनोज जरांगे म्हणाले, चांगले वातावरण दुषीत करण्यासाठी त्यांना काम करायचे आहे. हा खाटाटोप कशासाठी हे सरकारच्या लक्षात आले असेल. भुजबळ वातावरण खराब करत आहेत. भुजबळ काहीही बोललात, त्यांची अक्कल दाढ पडली आहे. ओबीसीतूनच आरक्षण घेणार मराठ्यांना देणार. तुम्ही मराठ्यांना भाषणातून काय धमक्या देता? फडणवीसांनी मराठ्यांचे मन जिंकले आहे. पण भुजबळ सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहे. अजितदादांना बदनाम करण्याचे काम भुजबळ करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला.Manoj Jarange
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, अधिकारी हुशार झाले कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले. ज्याची नोंद सापडली त्याला कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे असे अधिकाऱ्यांनाही वाटत आहे. मराठ्यांचे नेते ओबीसीचे आरक्षण कमी करायला येत नाहीत, ते गरिबीच्या लेकराचे आरक्षण मिळावे म्हणून येत आहेत. मराठ्याचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येणार नाहीत. मराठ्यांच्या लेकराला द्या हे सांगण्यासाठी बाहेर येतात.
भुजबळ शनी आहे
मला समाज महत्वाचा आहे. भुजबळ शनी आहे. भुरड आहे. कुठल्याही सरकारला साडेसाती आहे. ज्यांना त्यांना दिले त्यांच्याशी भुजबळांनी गद्दारी केल्याचे जरांगे म्हणाले. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता? फडणवीसांना काय म्हणाला होता? तुझी सुद्धा एक क्लिप आहे. ते काढून बघा, असे म्हणत जरांगेनी त्यांच्यावर टीका केली.
Manoj Jarange Slams Bhujbal’s Beed Rally as ‘Pressure Tactic’ Against Marathas; Affirms Reservation Will Come from OBC Quota; Accuses Bhujbal of Defaming Dy CMs
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : मोदी म्हणाले- काँग्रेस माओवादी दहशत लपवायचे; संविधानाचे पुस्तक कपाळी लावणारे माओवाद्यांचे रक्षक
- Indonesia : इंडोनेशिया चीनकडून J-10C लढाऊ विमाने खरेदी करणार; 42 विमानांची 75,000 कोटींना खरेदी
- Sonam Wangchuk : जोधपूर तुरुंगात वांगचुक यांना लॅपटॉप मिळाला; पत्नी गीतांजलीने 10 दिवसांत तिसऱ्यांदा घेतली भेट, बालविश्वकोश दिला
- ज्या जिल्ह्यात जाऊन पवार टाकायचे “डाव”, तिथे जाऊन फडणवीसांची “खेळी”; राष्ट्रवादी झाली “खाली”!!