नाशिक : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सत्तेपासून दूर झाल्यानंतर विरोधात बसून वजाबाकी सुरू केली, पण सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असूनही पक्षातून वजाबाकी सुरू झाली. हे राजकीय वास्तव आज समोर आले.
– ममतांनी दोन आमदारांना हाकलले
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या अनेक निष्ठावंत नेत्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी तृणमूळ काँग्रेस स्वत:हून सोडली. 100 नगरसेवकांनी राजीनामे दिले. दोन प्रवक्त्यांनी पक्ष सोडला. हे सगळे नेते स्वतःहून पक्षातून बाहेर पडले. पण त्यापलीकडे जाऊन ममता बॅनर्जी यांनी आज स्वतःहून तृणमूळ काँग्रेस मधून वजाबाकी केली. त्यांनी चक्क तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या दोन आमदारांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखविला. आमदार ऋतुबात्रा बॅनर्जी आणि आमदार संदिपान साहा या दोघांना तृणमूल काँग्रेस मधून निलंबित केले. दोघांनीही पक्षश्रेष्ठीचा भंग केला. पक्षाशी गद्दारी केली. पक्षाच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली, असा दोघांवरही आरोप ठेवला. दोन्ही नेत्यांना या आरोपांच्या उत्तराची संधी सुद्धा ममता बॅनर्जी यांनी दिली नाही. त्यांनी परस्पर दोघांना पक्षातून निलंबित केले. त्यामुळे त्यांची आमदारकी टिकली. पण ममता बॅनर्जी त्या राजकीय नुकसानीची सुद्धा पर्वा केली नाही. त्यांनी स्वतःहून तृणमूल काँग्रेस मधून आमदारांची वजाबाकी केली.
– पुण्यात सुनेत्रा आणि पार्थ पवारांना धक्के
पण काही झाले तरी, ममता बॅनर्जी यांना तृणमूळ काँग्रेस सत्तेवरून पायउतार होऊन विरोधात बसल्यानंतर राजकीय धक्के बसले. पण सुनेत्रा पवारांना तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर सत्तेत राहून सुद्धा पुण्यासारख्या त्यांच्या एकेकाळच्या तथाकथित बालेकिल्लात राजकीय धक्के बसले.
– तिसऱ्या फळीतले नेतेही ऐकेनात
सुनेत्रा पवारांनी पार्थ पवारांचे नेतृत्व प्रस्थापित करत असताना हे घडले. पार्थ पवारांनी पुण्यातून विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी रेटून दिली. पण ते पुण्यातल्या पक्षाचे ऐक्य टिकवू शकले नाहीत. पुण्यातल्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी नाराज करून ठेवले. म्हणून तर विलास लांडे यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदाराने सुद्धा तुम्ही आर्थिक निकष लावून तिकिटे वाटल्याचा आरोप केला. एरवी अजित पवार हयात असते, तर पक्ष नेतृत्वावर असा आरोप करायची विलास लांडे किंवा अन्य नेत्यांची हिंमत झाली नसती. पण सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना न जुमानता सुनील टिंगरे, विलास लांडे आणि रामदास गाडे यांच्यासारख्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
– पुण्यात बळ उरलेच किती??
मुळातच अजित पवार हयात असताना सुद्धा पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुका हरली होती. अजित पवारांनी सगळे बळ एकवटून आणि शरद पवारांबरोबर संधान बांधून भाजपची टक्कर घ्यायचा “डाव” खेळला होता. पण भाजपने आपल्या तिसऱ्या फळीतले नेते मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे यांना बळ देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आस्मान दाखविले होते. त्यामुळे मुळातच पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या दोन मोठ्या शहरांमधून राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालीच होती. तिचाच पुढचा टप्पा आज गाठला गेला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी सुद्धा जाहीरपणे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासारख्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादीतल्या वजाबाकी वर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पुण्यात आता राष्ट्रवादीचे बळ शिल्लक राहिलेच किती??, असा गंभीर सवाल समोर आला.
Mamata Banerjee and Sunetra Pawar playing minus political games
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!
- शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा
- Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई
- Pune-Pimpri : पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर; एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली