• Download App
    Maharashtra Weather Alert: Unseasonal Rain and Hailstorm Predicted from March 30राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता

    Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता

    Maharashtra

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :Maharashtra राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मध्ये 30 मार्चपासून शनिवारपर्यंत ढगाळ वातावरणासह दुपारनंतर वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.Maharashtra

    या काळात प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांचा कडकडाट, जोरदार वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल जाणवू शकतो, त्यामुळे बहुतांश भागात अस्थिर परिस्थिती राहणार आहे.Maharashtra

    30 मार्चला पावसाची सुरुवात होईल, तर 31 मार्चला त्याचा जोर काहीसा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर 1 ते 4 एप्रिलदरम्यान पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो. या काळात अनेक ठिकाणी दुपारनंतर अचानक पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.Maharashtra



    या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका सध्या काढणी सुरू असलेल्या रब्बी पिकांना बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, असे कृषी विभागाने सांगितले आहे. तसेच वादळी वारे आणि गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

    मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीजेच्या खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांजवळ उभे राहणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाळीव जनावरांचीही सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले होते. परभणी येथे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सोलापूर येथे 39 अंश आणि जळगाव येथे 38.5 अंश तापमान होते. मराठवाड्यातील काही भागांतही तापमान 37 अंशांपर्यंत पोहोचले होते.

    आता येत्या काही दिवसांत होणाऱ्या पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता असली, तरी अचानक होणाऱ्या पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra Weather Alert: Unseasonal Rain and Hailstorm Predicted from March 30

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bachchu Kadu : ऑपरेशन टायगरनंतर पुढचा डाव; ‘खासदारांनंतर आता आमदारही येतील’, बच्चू कडूंचा दावा, उद्याच्या कार्यक्रमात 6 बंडखोर खासदार गैरहजर राहणार?

    Sanjay Raut : ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरे गटाचा प्रतिहल्ला; आता ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार, संजय राऊतांचा इशारा

    Eknath Shinde : सहा खासदारांच्या बंडानंतर शिंदेंची ताकद वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नवा पॉवर सेंटर’ उदयास?