• Download App
    Maharashtra Unlocked : राज्य सरकारच्या निकषानुसार नागपूरचा समावेश पहिल्या स्तरात ; जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर ; वाचा सविस्तर। Maharashtra Unlocked: Nagpur included in first tier as per state government norms; Rules announced by the Collector; Read detailed

    Maharashtra Unlocked : राज्य सरकारच्या निकषानुसार नागपूरचा समावेश पहिल्या स्तरात ; जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर ; वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी

    नागपुर : महाराष्ट्रात आजपासून अनलॉकची प्रक्रीया सुरु झाली आहे. रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता हे दोन निकषावर अनलॉक जाहीर करण्यात आले . राजधानी मुंबई या निकषांमध्ये तिसऱ्या स्तरात येत आहे, तर उपराजधानी नागपूरचे या निकषांमध्ये पहिल्या स्तरामध्ये समावेश असून जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून होणाऱ्या अनलॉकसाठी नियमावली जाहीर केली आहे. Maharashtra Unlocked: Nagpur included in first tier as per state government norms; Rules announced by the Collector; Read detailed

    नागपूरमध्ये सध्या कोरोना रुग्णांचा पॉजिटीव्हीटी रेट हा ५ टक्क्यांपेक्षा कमी असून २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड सध्या भरले आहेत. राज्य शासनाने अनलॉकचे नियम जाहीर केले असले तरीही स्थानिक भागातली कोरोनाची परिस्थिती पाहता हे निर्बंध शिथील करायचे की कडक याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी रविवारी नियमावली जाहीर केली.



    नागपूर शहरातले अनलॉकचे नवे नियम

    १) अत्यावश्यक सेवेतली दुकानं – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

    २) अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

    ३) मॉल-थिएटर, मल्टिप्लेक्स, सिंगल थिएटर, नाट्यगृह – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, ५० टक्के क्षमतेने

    ४) रेस्टॉरंट – रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने

    ५) लोकल ट्रेन – नियमीत सुरु राहतील

    ६) सार्वजिनक जागा, मोकळी मैदानं, सायकलिंग ट्रॅक – सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील

    ७) खासगी कार्यालय – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

    ८) क्रीडा – आऊटडोअर स्पर्धा फक्त सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत

    ९) सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम – ५० टक्के क्षमतेने किंवा किमान १०० माणसांची मर्यादा

    १०) चित्रीकरण – नियमीत सुरु राहिल

    ११) लग्न आणि इतर समारंभ – १०० माणसांची मर्यादा किंवा एकूण क्षमतेच्या ५० टक्के

    १२) अंत्यविधी – फक्त ५० माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी

    याव्यतिरीक्त नागपुरातील बांधकाम नियमीत वेळेत सुरु राहणार असून ई-कॉमर्स सेवेलाही परवानगी देण्यात आली आहे. नागपुरात अजुनही जमावबंदी लागू . जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर्सही संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेतील बससेवाही पूर्णवेळ सुरु राहणार असून यावेळी मात्र प्रवाशांना उभं राहून प्रवास करता येणार नाहीये.

    याचसोबत शाळा-कॉलेज, कोचिंग क्लास, धार्मिक स्थळं, स्विमींग पूल बंद राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे.

    Maharashtra Unlocked: Nagpur included in first tier as per state government norms; Rules announced by the Collector; Read detailed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस