• Download App
    कंगना राणावत विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पोलीसात तक्रार दाखल करणार; नाना पटोले यांची माहिती । Maharashtra Pradesh Congress will lodge a complaint against Kangana Ranaut with the police; Information of Nana Patole

    कंगना राणावत विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पोलीसात तक्रार दाखल करणार; नाना पटोले यांची माहिती

    वृत्तसंस्था

    मुंबई : “भारताला स्वातंत्र्य भिकेत मिळाले. महात्मा गांधी यांचा क्रांतिकारक भगतसिंग यांच्या फाशीला पाठिंबा होता,” अशी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांना दिली आहे. Maharashtra Pradesh Congress will lodge a complaint against Kangana Ranaut with the police; Information of Nana Patole

    कंगना राणावत हिने वादग्रस्त वक्तव्य करणे सोडलेले नाही. तिने इंडिया टुडेच्या मुलाखतीत भारताला भिकेमध्ये स्वातंत्र्य मिळाले, असे विधान केले होते. त्यानंतर तिने काल काही बातम्या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत महात्मा गांधी यांचा क्रांतिकारक भगतसिंग यांच्या फाशीला देखील पाठिंबा होता, असे वक्तव्य केले आहे.

    यावरूनच देशात गदारोळ उठला असून तिच्याविरोधात काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या दोन्ही नेत्यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. सकाळी सकाळी त्या बाईचे नाव घेऊ नये, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी कंगना राणावत हिच्यावर प्रहार केला आहे, तर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे.

    Maharashtra Pradesh Congress will lodge a complaint against Kangana Ranaut with the police; Information of Nana Patole

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य