• Download App
    ज्या न्यायाधीशांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना घरचं जेवण नाकारलं, त्यांची थेट यवतमाळच्या केळापूर कोर्टात बदली । Mumbai Special court judge H S Satbhai transfered to Yavatmal Court, Anil Deshmukh and Many Other Politicians Cases Was Before Him

    ज्या न्यायाधीशांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना घरचं जेवण नाकारलं, त्यांची थेट यवतमाळच्या केळापूर कोर्टात बदली

    भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कोठडीत आहेत. नुकतीच त्यांची घरचे जेवण मिळण्याची मागणी कोर्टाने नाकारली होती. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाकडून ही मागणी फेटाळण्यात आली होती. न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी देशमुख यांना आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दांत त्यांना फटकारले होते. तसेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तथापि, आता मुंबई उच्च न्यायालयाकडून न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळच्या केळापूर तालुका कोर्टात बदली करण्यात आली आहे. Mumbai Special court judge H S Satbhai transfered to Yavatmal Court, Anil Deshmukh and Many Other Politicians Cases Was Before Him


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कोठडीत आहेत. नुकतीच त्यांची घरचे जेवण मिळण्याची मागणी कोर्टाने नाकारली होती. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाकडून ही मागणी फेटाळण्यात आली होती. न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी देशमुख यांना आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दांत त्यांना फटकारले होते. तसेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तथापि, आता मुंबई उच्च न्यायालयाकडून न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळच्या केळापूर तालुका कोर्टात बदली करण्यात आली आहे.

    15 नोव्हेंबरला बदली

    मुंबई उच्च न्यायालयाने 15 नोव्हेंबर रोजीच न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची प्रशासकीय कारणांमुळे तातडीनं बदली करण्यात येत असल्याचा आदेश दिला. सातभाई यांची यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे. सातभाई यांच्या बदलीला सुप्रीम कोर्टानेही 13 नोव्हेंबर रोजी संमती दिली होती.



    न्या. सातभाई यांच्यासमोर बड्या नेत्यांच्या खटल्यांची सुनावणी

    न्या. एच. एस. सातभाई यांच्या समोर राज्यातील मोठ्या नेत्यांच्या खटल्यांची सुनावणी झाली. यात राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांच्या खटल्यांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाकडून बदलीा आदेश मिळाल्यावर न्या. एच. एस. सातभाई हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत.

    Mumbai Special court judge H S Satbhai transfered to Yavatmal Court, Anil Deshmukh and Many Other Politicians Cases Was Before Him

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली