• Download App
    Maharashtra legislative council election भाजप - शिवसेनेचे मिळून १५ उमेदवार झटकन जाहीर; पण राष्ट्रवादीची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक!!

    भाजप – शिवसेनेचे मिळून १५ उमेदवार झटकन जाहीर; पण राष्ट्रवादीची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक!!

    नाशिक : भाजप आणि शिवसेना यांनी मिळून एका झटक्यात 15 उमेदवार जाहीर करून टाकले, पण राष्ट्रवादी काँग्रेसची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक झाली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे राजकीय सत्य सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड झाले. Maharashtra legislative council election

    स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या 17 मतदारसंघांपैकी 15 जागा भाजप आणि शिवसेनेने आपल्याकडे घेतल्या. त्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष झाला, पण दोन्ही पक्षांनी सामंजस्य दाखवून जागावाटप केले. त्यापैकी अकरा मतदार संघ भाजपच्या वाट्याला आले, तर चार मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेले. या 15 मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये भाजपने 11 पैकी सहा ठिकाणी आयात उमेदवार दिले, तर पाच ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली. यामध्ये अरुण लखानी यांचा समावेश आहे.

    अरुण लखनींना उमेदवारी

    अरुण लखानी हे विदर्भातले संघ आणि भाजपचे जुने कार्यकर्ते असून ते आता सुप्रिया सुळे यांचे व्याही झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात माहिती झाले. त्यामुळे पवारांनी संघ परिवारातल्या नेत्याशी नातेसंबंध जोडल्याची चर्चा झाली. पण आमची विचारसरणी आमच्याकडे आणि त्यांची विचारसरणी त्यांच्याकडे!!, असे सांगून अरुण लखानी यांनी पवार + लखानी कौटुंबिक राजकारणावर पडदा पाडायचा प्रयत्न केला.

    अनिकेत तटकरेंना निवडणूक जड

    पण या सगळ्या राजकारणात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची पुरती गोची झाली. राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त दोन जागा आल्या पण तिथे सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड मध्ये जोरदार ताणून धरले. त्यामुळे अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची निवडणूक जड जाणार असल्याचे स्पष्ट झाले.



    विक्रम काकडेंची उमेदवारीही जाहीर करता येईना

    पण त्या पलीकडे जाऊन सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला विक्रम काकडे यांची पुण्यातील उमेदवारी जाहीर सुद्धा करता आली नाही. पार्थ पवारांनी रेटून विक्रम काकडे यांची उमेदवारी लावून धरली, पण राष्ट्रवादीतल्या पुण्यातल्या इतर नेत्यांनी त्या नावाला जोरदार विरोध केल्याने सुनेत्र पवारांना विक्रम काकडे यांची उमेदवारी जाहीर करता आली नाही. सुनेत्रा पवारांनी काल रात्री दीड वाजेपर्यंत बैठका घेतल्या. पण त्या शेवटपर्यंत उमेदवारीचा निर्णय घेऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विक्रम काकडे यांची उमेदवारी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल पर्यंत लटकतीच राहिली. एकीकडे विधान परिषदेच्या उमेदवारी राष्ट्रवादीत मोठा संघर्ष झाला त्याच वेळी कात्रज दूध संघात सुद्धा पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये राष्ट्रवादीला संघर्ष सहन करावा लागला. कात्रज दूध संघाचे पदाधिकारी सुद्धा पक्ष नेतृत्वाचे ऐकेनासे झाले. कात्रज दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे यांनी राजीनामा देताना कमालीचे आढेवेढे घेतले. वैशाली नागवडे यांचा फोन येऊन सुद्धा त्यांनी राजीनामा दिला नाही. शेवटी पार्थ पवारांना मध्यस्थी करावी लागल्यानंतर स्वप्निल ढमढेरे यांनी राजीनामा दिला.

    पुण्यातले पदाधिकारी नाराज

    दुसरीकडे उपाध्यक्ष मारुती जगताप यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्वाचा आदेशच धुडकावला. त्यांनी राजीनामा दिला नाही उलट ते संचालक मंडळाच्या बैठकीला सुद्धा गैरहजर राहिले. ईमेल द्वारे रजेचा अर्ज पाठविला आणि ते नॉट रिचेबल झाले. सुनेत्रा पवारांना पुण्याच्या स्थानिक राजकारणात सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले.

    Maharashtra legislative council election, NCP in trouble

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vikas Lawande : ‘सरकार माझ्या हत्येची वाट पाहतंय का?’; विकास लवांडेंचा गंभीर आरोप, कुटुंबालाही धोका असल्याचा दावा

    Dattatray Bharne : ‘कर्जमाफीची घोषणा लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे संकेत, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

    CM Devendra Fadnavis : मराठा समाजाला न्याय देण्याचीच शासनाची भूमिका; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- दिलेल्या आश्वासनांवर सरकार ठाम