• Download App
    CM Fadnavis: Maharashtra Govt to Honor Divya Deshmukh for FIDE Women's Chess Worमहाराष्ट्र सरकारतर्फे दिव्या देशमुखचा सन्मान करू; ld Cup Win

    CM Fadnavis : महाराष्ट्र सरकारतर्फे दिव्या देशमुखचा सन्मान करू; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- फायनलमध्ये दोन्ही खेळाडू भारतीय असल्याचा अभिमान

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Fadnavis  नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकला आहे. अंतिम फेरीत टाय-ब्रेक फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करून तिने हे विजेतेपद पटकावले. विश्वविजेतेपद मिळवण्यासोबतच ती भारताची 88 वी ग्रँडमास्टर देखील बनली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे. CM Fadnavis

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, किशोरवयीन अशी पहिली खेळाडू आहे जीने ग्रँड मास्टरचा किताब मिळवला. अतिशय चांगली कामगिरी तिने केली आहे. 23 गोल्ड मेडल तिने जिंकले आहे. अतिशय होतकरू खेळाडू म्हणून आपण तिच्याकडे बघू शकतो. महाराष्ट्र सरकारतर्फे आम्ही सन्मान करू. CM Fadnavis



    पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांनी आपल्या भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे, अशा खेळाडूंचा निश्चित सन्मान झाला पाहिजे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्र्यांना बोलून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. आपल्या खेळाडूंना चांगले वातावरण मिळावे व योग्य प्लॅटफॉर्म मिळावे यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत. या फायनलमध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू भारतीय होत्या हा देखील आपल्याला अभिमान आहे. आपल्या खेळाडूंनी इतर सर्व देशांच्या खेळाडूंना मागे टाकत फायनल गाठले ही खूप मोठी गोष्ट आहे. इतक्या कमी वयात फायनल पर्यंत पोहोचते आणि 19 व्या वर्षी महत्त्वाची स्पर्धा जिंकते ही अतिशय मोठी गोष्ट आहे.

    दिव्या देशमुखने ऐतिहासिक कामगिरी केली- अजित पवार

    जॉर्जिया येथे पार पडलेल्या FIDE महिला वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, महाराष्ट्र कन्या दिव्या देशमुखने आत्मविश्वासपूर्ण खेळ आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर विश्वविजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या अभूतपूर्व यशामुळे दिव्या देशमुख हिने प्रथम भारतीय महिला FIDE विश्वचषक विजेती आणि भारताची ८८वी ग्रॅण्डमास्टर म्हणून आपली नोंद केली आहे. तिच्या या पराक्रमामुळे संपूर्ण देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल दिव्या, तिचे पालक व प्रशिक्षक यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

    एकनाथ शिंदेंनीही दिल्या शुभेच्छा

    जॉर्जिया देशातील बटुमी शहरात खेळल्या गेलेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने भारताच्याच कोनेरू हम्पीचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी दोन्ही भारतीय बुद्धिबळपटूंमध्येच होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

    दिव्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिचे तसेच उपविजेती भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी या दोघींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

    CM Fadnavis: Maharashtra Govt to Honor Divya Deshmukh for FIDE Women’s Chess World Cup Win

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    गोदावरी आरती उपक्रमात महिलांचा वाढता सहभाग; रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या महिला कार्यकर्त्यांचा दिल्लीत राष्ट्रीय महिला आयोगाकडून गौरव!!

    रेव्ह पार्टीच्या व्याख्येवरून सरकारशी वितंडवाद; दारुड्यांच्या पार्टीला मात्र सुप्रिया सुळे + रोहित पवार आणि खडसे यांची साथ!!

    Mumbai Wife Suicide : मुंबईत पतीच्या ब्लॅक मनीला कंटाळून पत्नीची आत्महत्या; आरोपी ‘म्हाडा’चा अधिकारी, काळा पैसा पांढरा करण्याचा होता दबाव