विशेष प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील गुजरातमधील हापा स्थानकातून रो-रो सेवेद्वारे तीन टॅंकर महाराष्ट्रासाठी रवाना झाले. तीन टँकरद्वारे ४४ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) कळंबोलीमध्ये पोहचणार आहेत. एकूण ८६० किमीचा प्रवास केला जाणार आहे.Maharashtra get oxygen from Gujarat also
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. मात्र, राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने इतर राज्यांतून त्याचा पुरवठा केला जात आहे. त्यानुसार विशाखापट्टणमधून सात टॅंकर महाराष्ट्रात आणण्यात आले होते. आता आणखी तीन टँकरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.
रो-रो सेवेद्वारे वैद्यकीय ऑक्सिजन आणताना विशेष काळजी घेण्यात आली आहे. रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायर, पादचारी पूल आदींचा अंदाज घेऊन रो-रो सेवेद्वारे टँकर चालवण्यात येत आहेत.
ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या वेगासाठी गुरुत्वाकर्षण आणि ऑक्सिजनची आवश्यकता पाहता मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष खबरदारी म्हणून ऑक्सिजन दाबाचे निरीक्षण करणे आणि सुरक्षा बाबी तपासणे सुरू होते, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली