• Download App
    विधानसभेच्या अध्यक्ष होणार काँग्रेसचा; शह – काटशह शिवसेना – राष्ट्रवादीचा; संग्राम थोपटे नको असल्यास पृथ्वीराजबाबांचे नाव...!!s Maharashtra assembly speaker post race; shiv sena suggests prithviraj chavan`s name against will of sharad pawar

    विधानसभेच्या अध्यक्ष होणार काँग्रेसचा; शह – काटशह शिवसेना – राष्ट्रवादीचा; संग्राम थोपटे नको असल्यास पृथ्वीराजबाबांचे नाव…!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसचाच असणार आहे. पण या निवडणूकीत शह – काटशह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते खेळायला लागलेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर असताना शरद पवारांच्या पुणे जिल्ह्यातील राजकारणाला ते सूट होणार नाही म्हणून मुंबईचे आमदार अमिन पटेल यांचे नाव पुढे आणले गेले. Maharashtra assembly speaker post race; shiv sena suggests prithviraj chavan`s name against will of sharad pawar

    पण आता त्यालाही काटशह शिवसेनेने दिल्याचे बोलले जात आहे कारण शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पसंती दिल्याचे समजते. म्हणजे शरद पवार हे संग्राम थोपटे यांचे नाव टाळत होते, तोच पृथ्वीराज चव्हाणांचे नाव पुढे करून शिवसेनेने पवारांसमोरच पेच उभा केल्याचे दिसते आहे.

    संग्राम थोपटे हे अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत. थोपटे – पवार राजकीय वाद सर्वश्रूत आहे. तसाच पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील राजकीय वादही सर्वश्रूत आहे. मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवा मारलाय का, अशी शेरेबाजी केली होती.



    त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्यापासूनच विरोध आहे. पण शिवसेनेने दूसरीकडे संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष झाले तर ते आक्रमक असलेल्या विरोधी पक्ष भाजपला कितपत नियंत्रणात ठेवू शकतील अशी शंका उपस्थित केल्याचे समजते. अर्थात ही शंका पवारांच्या प्रेरणेतून उपस्थित केलेली असू शकते. पण संग्राम थोपटे यांना पर्याय म्हणून काँग्रेसमधून पुढे आलेले पृथ्वीराज चव्हाण यांचे नावही पवारांना अजिबात पसंत पडणारे नाही. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणे हा आता फक्त काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न राहिलेला नाही.

    पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे जाणार हे समजेलच मात्र त्यावरून सुरू असलेल्या वादामुळे आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. या धुसफूसमुळे आता महाविकासआघाडीत मिठाचा खडा तर पडणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    Maharashtra assembly speaker post race; shiv sena suggests prithviraj chavan`s name against will of sharad pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस