• Download App
    महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी मोठी बातमी; वैद्यकीय शिक्षणाच्या श्रेणीवर्धनासाठी 500 दशलक्ष डॉलर्सची मदत!!|Maharashtra; 500 million dollars help to upgrade medical education!!

    महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी मोठी बातमी; वैद्यकीय शिक्षणाच्या श्रेणीवर्धनासाठी 500 दशलक्ष डॉलर्सची मदत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांच्या श्रेणीवर्धनासाठी आशियाई विकास बँकेकडून 500 दशलक्ष डॉलर्सची मदत मिळाली आहे.Maharashtra; 500 million dollars help to upgrade medical education!!

    या मोठ्या आर्थिक मदतीतून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध सुविधा अद्ययायावत करण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट लिहून ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच आशियाई विकास बँकेचे अधिकारी या सर्वांचे फडणवीस यांनी आभार मानले.



    देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट अशी :

    माननीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मी आभार मानतो. कारण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न तृतीयक रुग्णालयांच्या श्रेणीवर्धनासाठी आशियाई विकास बँकेकडून $500 दशलक्ष USD मिळाले. हे ADB अधिकारी, मित्रा आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर घडले.

    ADB कडून मिळालेला हा पाठिंबा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि दूरदृष्टीखाली एक नवा सशक्त महाराष्ट्र घडवण्याच्या आमच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना नक्कीच गती देईल!!

    Maharashtra; 500 million dollars help to upgrade medical education!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !