• Download App
    स्व. बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रखर हल्लाबोल; मुंबई महापालिकेतला ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटेल|Late. Narayan Rane's intense attack on Shiv Sena by saluting Balasaheb's memories; 32 years of sin will break out in Mumbai Municipal Corporation

    स्व. बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रखर हल्लाबोल; मुंबई महापालिकेतला ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटेल

    प्रतिनिधी

    मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकेच्या फैरी झाडणे यात काही नवीन नाही. पण आज त्यांनी शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन तिथल्या तिथेच सध्याच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला.Late. Narayan Rane’s intense attack on Shiv Sena by saluting Balasaheb’s memories; 32 years of sin will break out in Mumbai Municipal Corporation

    नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येऊ न देण्याचा निर्धार शिवसेनेने केला होता. परंतु, नारायण राणे प्रत्यक्ष स्मृतीस्थळावर दाखल होताना आणि दाखल झाल्यावरही असा काही विरोध झाला नाही.



    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहिल्यावर नारायण राणे पत्रकारांशी बोलले. ते म्हणाले, की बाळासाहेबांबद्दलच्या मी आदराच्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी एवढेच सांगितले की साहेब, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला हवा होतात.

    मला बाळासाहेबांनीच घडवले आहे. सगळे काही दिले आहे. ते आज हयात असते तर म्हणाले असते, नारायण तू असेच यश मिळव, माझे आशीर्वाद आहेत. असे म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता. पण आज जरी प्रत्यक्षात त्यांचा हात माझ्या डोक्यावर नसला, तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत असे मला वाटते, असे उद्गार राणे यांनी काढले.

    त्यानंतर मात्र, त्यांनी स्मृतीस्थळावरूनच शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, की मी एवढेच सांगेन, कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो, दैवतांचे स्मारक असो, त्याला विरोधाची भाषा कोणी करू नये. भावनेचा विचार करून मग वक्तव्य करावे. कुणाला वाटत असेल, तर स्वत: बोलावे. डाव्या-उजव्यांना बोलायला लावू नये. जशास तसे उत्तर देण्याबद्दल माझी ख्याती आहे.

    त्यामुळे कुणीही आपल्यामध्ये मांजरीसारखे आड येऊ नये. ही जन आशीर्वाद यात्रा यशस्वी होईल आणि येणारी मुंबई महापालिका निवडणूक भाजपा जिंकेल. शिवसेनेचा ३२ वर्षांचा पापाचा घडा या ठिकाणी फुटल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांमध्ये राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

    Late. Narayan Rane’s intense attack on Shiv Sena by saluting Balasaheb’s memories; 32 years of sin will break out in Mumbai Municipal Corporation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस