• Download App
    Shinde's 'Shock Move': Jyoti Waghmare Nominated for Rajya Sabha VIDEOS

    Shinde : राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंकडून ज्येष्ठ नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी, ज्योती वाघमारे यांचा अर्ज दाखल

    Shinde

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Shinde राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अंदाज चुकवत मोठे ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला तांत्रिकदृष्ट्या राज्यसभेची एकच जागा येत असताना, उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरवले आहे. ज्योदी वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.Shinde

    महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीकडून उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहेत. भाजपकडून चार उमेदवार देण्यात आल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही उमेदवारांची नावे पुढे येऊ लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी प्राध्यापक ज्योती वाघमारे यांचे नाव जाहीर झाले आहे. सुरुवातीला माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती समोर येत असून आता ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Shinde



    विविध राजकीय मुद्द्यांवर पक्षाची बाजू ठामपणे मांडली

    ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यापासून पक्षाची वैचारिक भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाची बाजू ठामपणे मांडली आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारीही ज्योती वाघमारे यांनी सातत्याने पार पाडली आहे. आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वामुळे त्या शिंदे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात.

    काँग्रेसमधून शिवसेना शिंदे सेनेत दाखल

    ज्योती वाघमारे या फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीतून पुढे आलेल्या असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी सक्रिय काम केले आहे. यापूर्वी त्या काँग्रेस पक्षातही कार्यरत होत्या. त्यांच्याकडे काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षाची जबाबदारी होती. प्रणिती शिंदे यांच्या प्रचार सभांचे सुत्रसंचलन, संयोजन देखील त्या करीत होत्या‌.

    ज्योती वाघमारेंनाच संधी का?

    दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मजबूत वैचारिक आणि राजकीय आव्हान उभे करण्याच्या दृष्टीनेही ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच या चर्चाना अंतिम स्वरूप मिळणार असले तरी शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

    Shinde’s ‘Shock Move’: Jyoti Waghmare Nominated for Rajya Sabha VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Minister Pratap Sarnaik : मंत्री सरनाईकांची घोषणा- एसटी बसचालक, वाहक, कर्मचाऱ्यांना दररोज अल्कोटेस्ट सक्तीची, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य

    Supriya Sule : राज्यसभा बिनविरोध होईल असे दिसतंय; शरद पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळेंनी मानले ठाकरेंचे आभार

    Sharad Pawar : हा प्रवास माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा; उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना