• Download App
    Jitendra Awhad Fumes Over Vidhan Bhavan Clash; Padalkar Apologizes आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार?

    Jitendra Awhad : आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? विधिमंडळातील घटनेवर आव्हाडांचा संताप, तर पडळकरांकडून दिलगिरी

    Jitendra Awhad

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Jitendra Awhad भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आज विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडल्याची घटना घडली. या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला. तर गोपीचंद पडळकर यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.Jitendra Awhad

    विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना आज विधानभवनाच्या परिसरात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश कटले याने जितेंद्र आव्हाड  ( Jitendra Awhad ) यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण केली असून, शिवीगाळही करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवला आहे.Jitendra Awhad



    नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

    मी भाषण करून थोडी मोकळी हवा घेण्यासाठी सभागृहाबाहेर आलो होतो. तेव्हा हा प्रकार घडला. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. हा हल्ला कुणी केला हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे. याहून मोठा पुरावा काय पाहिजे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्ही विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील, तर आमचेच जीव सुरक्षित नाहीत. मी स्वतः ट्विट केले आहे. मला आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे. मारून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. कुत्रा, डुक्कर अजून बरेच काही लिहिले आहे. काय चालू आहे विधानसभेत? असेही ते म्हणाले.

    … तर कशाला राहायचे आमदार?

    विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? काय गुन्हा आहे आमचा? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला. कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई-बहिणींवर शिव्या देतो. त्याला ऑफिशिअल लँग्वेज म्हणून घोषित करा. असंसदीय शब्द वापरले जातात. त्यालाच आता संसदीय शब्द म्हणून घोषित करा. सत्तेचा एवढा माज, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

    गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

    विधानभवानातील आजच्या प्रकरणानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानभवनात घडलेली आजची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेबाबत मी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींसमोर दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

    Jitendra Awhad Fumes Over Vidhan Bhavan Clash; Padalkar Apologizes

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    डोक्यात हवा गेल्याची उद्धव ठाकरेंची कबुली, वडेट्टीवारांचा दुजोरा; पण काढणार कोण राहुल गांधींच्या डोक्यात गेलेली हवा??

    Vadettiwar : नाना पटोले यांना मुख्यमंत्र्यांनी धू धू धुतले तरी वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा ते आरोप केले

    Nitesh Rane : हिरव्या सापांना जवळ केल्याने ठाकरे ब्रँड संपला, नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल