• Download App
    Maharashtra Politics अर्थखाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार? जय पवारांचा बारामतीतून मोठा दावा, म्हणाले - मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली

    Maharashtra Politics : अर्थखाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार? जय पवारांचा बारामतीतून मोठा दावा, म्हणाले – मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली

    Maharashtra Politics

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Maharashtra Politics  महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून झालेल्या मोठ्या स्थित्यंतरानंतर आता आणखी एका संभाव्य बदलाची चर्चा रंगू लागली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (अजित पवार) पुन्हा एकदा राज्याचे महत्त्वाचे मानले जाणारे अर्थखाते सोपवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी बारामतीमधील एका जाहीर कार्यक्रमात यावर अत्यंत भाष्य केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा शब्द दिल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे.Maharashtra Politics

    बारामतीतील कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जय पवार यांनी पक्षाच्या भूमिकेविषयी आणि थांबलेल्या विकासकामांवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “अनेकांचे असे म्हणणे आहे की अर्थखाते आपल्या पक्षाकडे राहिलेले नसल्यामुळे काही भागांतील विकासकामे प्रलंबित आहेत. मात्र, वास्तव तसे नाही. अजितदादा आपल्याला अचानक सोडून गेले आणि त्यानंतर लगेचच राज्याचा अर्थसंकल्प सादर करायचा होता. अशा आणीबाणीच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे खाते तात्पुरते स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतला होता.”Maharashtra Politics



    पुढे बोलताना जय पवार यांनी मंत्रिमंडळातील आगामी बदलांचे संकेत दिले. “नुकतीच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि आमची या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितले आहे की, लवकरात लवकर हे अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुपूर्द केले जाईल. अजितदादांचे महाराष्ट्राच्या विकासाचे जे स्वप्न होते, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करत आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटले होते?

    दुसरीकडे, अर्थखातं राष्ट्रवादीला परत देण्याबाबत आणि महायुतीमध्ये यावरून सुरू असलेल्या अंतर्गत अस्वस्थतेबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. काही दिवसांपूर्वी माध्यमप्रतिनिधींनी सुनेत्रा पवार यांच्या कथित नाराजीबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होता.

    त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “माझ्याकडे अजूनतरी अधिकृतपणे कोणीही अर्थखात्याची मागणी केलेली नाही. तसेच माझ्यापर्यंत अशी कोणतीही नाराजी आलेली नाही. जर माझ्यासमोर असा काही विषय आला, तर मी त्यावर नक्कीच सविस्तर बोलेन.”

    तसेच, १२ जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा पत्रकारांनी ‘आगामी काळात अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे काही संकेत आहेत का?’ असा थेट प्रश्न विचारला होता, तेव्हा फडणवीसांनी एका वाक्यात सूचक उत्तर दिले होते की, “आज तरी अर्थखातं माझ्याकडेच आहे.”

    Maharashtra Politics: Jay Pawar Claims Finance Ministry Will Soon Return to NCP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून नसरापूर प्रकरणाच्या निकालाचे स्वागत; असाच न्याय संतोष देशमुख अन् मालेगाव प्रकरणातही देण्याची मागणी

    Sudhir Mungantiwar : राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज; TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

    Lohagad Murder Case : सियाने केतनकडून ₹1 कोटी घेऊन चेतनला दिले; कॅब ड्रायव्हरचा दावा – सियाची बालीला जाण्याची इच्छा नव्हती, पासपोर्टही गायब केला