• Download App
    कॉंग्रेसला खुश करण्यासाठी जनाबसेनेचे अल्पसंख्याकांचे लांगुलचालन, हिंदू सणांना बंदी पण मुख्यमंत्र्यांकडून ईद मिरवणुकीला परवानगी|Janabsena's tailgating of minorities to please Congress, ban on Hindu festivals but CM allows Eid procession

    कॉंग्रेसला खुश करण्यासाठी जनाबसेनेचे अल्पसंख्याकांचे लांगुलचालन, हिंदू सणांना बंदी पण मुख्यमंत्र्यांकडून ईद मिरवणुकीला परवानगी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कॉंग्रेसला खुश करण्यासाठी जनाबसेनेकडून अल्पसंख्याकांचे लांगुलचालन होत आहे. हिंदू सणांना बंदी पण मुख्यमंत्र्यांकडून ईद मिरवणुकीला परवानगी दिली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.Janabsena’s tailgating of minorities to please Congress, ban on Hindu festivals but CM allows Eid procession

    भातखळकर म्हणाले, कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू संणांवर बंदी घालणाऱ्या जनाब सेनेने ईद मिरवणुकीला मात्र परवानगी दिली, कॉंग्रेसला खुश करण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांकडून अल्पसंख्याकांचं पुन्हा एकदा लांगूनचालन करण्यात आले आहे. यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंदुत्व किती ढोंगी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



    जनादेशाचा अनादर करून कॉंग्रेस सोबत सत्तेत बसायचे, शिवाजी पार्क उजळविण्याच्या नावाखाली इटालियन दिवे वापरून गांधी परिवाराला खुश ठेवायचे यातून जनाब सेनेची वाटचाल कॉंग्रेसच्या प्रकाशाखाली होत असल्याचे स्पष्ट दिसते.

    उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येणार नसल्याचे मान्य करणाऱ्या मुंबई महापालिकेने मात्र कोरोनाची भीती दाखवत करोडो हिंदुच्या श्रद्धेचा विषय असलेल्या दहीहंडी, गणेश उत्सव, गरबा साजरा करण्यास व देवीच्या मिरवणुका काढण्यास बंदी घातली.

    कोरोनाचे नियम पाळत या सणांना परवानगी द्या अशी मागणी भारतीय जनता पक्षाने वारंवार करून सुद्धा हिंदू द्वेष्ट्या शिवसेनेने या सणांवर बंदी तर घातलीच, परंतू कोरोनाचे सर्व नियम पाळत सार्वजनिक पद्धतीने उत्सव साजरे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुद्धा त्यांनी केले.

    याउलट अगोदर मोहरम आणि ईद मिरवणुक काढण्याला मात्र बिनदिक्कत परवानगी देण्यात आली. यातून उद्धव ठाकरे हे हिंदुहृद्यसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पूत्र असल्याचा त्यांना विसर पडला असल्याचेच वारंवार दिसून येत असून स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे उद्धव ठाकरे यांना ‘हिंदू’ शब्दाचा पूर्णपणे विसर पडला असल्याची टीका भातखळकर यांनी केली.

    Janabsena’s tailgating of minorities to please Congress, ban on Hindu festivals but CM allows Eid procession

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल