विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवार यांच्या अपघातानंतर 2 महिने झाली तरी तपास अधिकाऱ्यांकडे स्मरणपत्र दिलेले नाही, सीआयडीकडे काय चाललयं हे माहिती नाही. राज्यात आम्ही विविध ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तेही झालं नाही, पण कर्नाटकमध्ये आम्ही जाऊन आलो. कर्नाटकमध्ये आम्ही प्रयत्न केले, ते सरकार दादांना न्याय देण्यासाठी पुढे सरसावले असून त्यांनी झिरो एफआयआर करुन डिजींकडे पाठवला, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गुन्हा नोंद झाल्याची माहिती दिली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी दबाव आणल्यामुळेच जय पवारची पत्रकार परिषद रद्द झाली, असा आरोप रोहित पवारांनी केला.Jai Pawar’s press conference was cancelled due to pressure from Praful Patel, Sunil Tatkare; Rohit Pawar’s allegations
जे आम्हाला जमलं ते आम्ही केलं, पाठपुरावा केला. त्यामुळे, कर्नाटकात झिरो एफआयआरने गुन्हा नोंद झाला आहे, असेही त्यांनी म्हटलं. तसेच, अजितदादा जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आली, पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी कापली, असा दावा रोहित पवारांनी केला.
आम्ही राहुल गांधींना भेटलो, ते म्हणाले ज्या राज्यात न्याय मिळू शकतो अशा राज्यांत जावा, गवई साहेबाचे उदाहरण आहे. कर्नाटकात दादांच्या अपघातानंतर गुन्हा दाखल झाला, मी त्या राज्याचे आभार मानतो. मी फक्त कर्नाटकात गेलो, तिथे एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ०० ने तो राज्याकडे पाठवला. मी मरीनड्राईव्ह येथे गेलो तिथे एफआयआर घेतला नाही, मग मी बारामतीला गेलो, सीआयडीकडेही गेलो. मी कोर्टात गेलो असतो, हा गुन्हा नोंदवण्यासाठी खूप काही करावं लागतं. मात्र त्यांच्याच पार्टीतले नेते कसे राजकारण करत आहे हे मी उद्या इथे सांगेन असे म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनाही लक्ष्य केलंय.
नाशिक प्रकरणात एसआयटी करतात, चुकीच्या व्यक्तीला अटक करतात, जलद कारवाई होते. मग दादांच्या प्रकरणात का होत नाही. दादांच्या पक्षातील नेते सुद्धा काही बोलत नाही हे दुर्दैव आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचाच दबाव म्हणून जय पवार यांची पत्रकार परिषद झाली नाही, असा दावाही रोहित पवार यांनी केला. प्रफुल्ल पटेल यांना याचा तपास व्हावा असे वाटत नाही, तो ब्लॅकबॉक्स कुठेही अमेरिकेला गेलेला नाही. एव्हीएशनमधील अनेक अधिकारी त्यांचे परिचयाचे, जवळचे आहेत. एआयव्हीला एकच सांगायचं आहे, 9 अहवाल असताना एकही बाहेर आणला नाही. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.
– पक्षातील अनेक नेत्यांनी करंगळी कापली
अजित पवार जिवंत होते, तेव्हा त्यांच्या घराबाहेर ब्लॅकमॅजिक झालेले पाहिलं, मुंबईच्या घराबाहेरही झालं. दादांच्या पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी कापली, दादांची ताकद जावी आणि आपल्याला मिळावी हा हेतू कोणाचा होता हे तपासणं गरजेचं आहे, असे म्हणत रोहित पवारांनी अशोक खरात प्रकरणाकडेही लक्ष वेधलं आहे. अजितदादांचं ते पद मिळवण्यासाठी कोणी कोणी ब्लॅकमॅजिक केले हे पाहणं महत्वाचं आहे. दादा असताना ते पद मिळणार नाही म्हणून ही काळी जादू केली असा गंभीर आरोपच रोहित पवार यांनी केलाय. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, या केसमध्ये जी व्यक्ती अडकली जात आहे, कार्यकर्त्यांची इच्छा नसताना तटकरे कोणाची वर्णी लावत आहेत. इथे फक्त हवेत गोळीबार चालला आहे, दोन महिने आम्ही हाच विषय घेऊन होतो, इतर कुठलाही विषय आम्ही घेतला नाही.
– काही कागदं आमच्या हाती
उद्यापासून राजकीय प्रश्न मी घेईन, दादांच्या पक्षातील काही कागदं आमच्या हाती लागली आहे, अनेक गौप्यस्फोट आम्ही करू. भाजपला वाटतयं अजित पवार यांचा पक्ष संपला आहे. दादांच्या आमदारांना तिथे राजीनामा देऊन भाजपकडून त्यांना उभं करायचं हा विचार आहे. त्यामुळे फोकस आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडे वळवला आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला.
– कर्नाटकात एफआयआर
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात FIR दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल 23 मार्च रोजी कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने FIR दाखल करुन तो महाराष्ट्र पोलिसांकडं वर्ग करण्यात आला. याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या FIR चा तपास कशा पद्धतीने होतो याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवू असे रोहित पवार यांनी म्हटलं. तसेच, हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मग भले ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू, असेही त्यांनी म्हटले.
Jai Pawar’s press conference was cancelled due to pressure from Praful Patel, Sunil Tatkare; Rohit Pawar’s allegations
महत्वाच्या बातम्या
- Shankaracharya : शंकराचार्य 2.18 लाख सैनिकांची चतुरंगिणी सेना बनवतील; सेना गायी, धर्मशास्त्रे व मंदिरांचे रक्षण करेल
- Ujjal Bhuyan : सुप्रीम कोर्टाचे जज म्हणाले-न्यायव्यवस्था गरजेपेक्षा जास्त कठोर होत आहे; म्हणून लोक तुरुंगात सडत आहेत
- 3000 राजमाता जिजाऊ स्मार्ट बसेसचे महाराष्ट्राला लोकार्पण; बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जीपीएस सिस्टीम सह अत्याधुनिक सोयींचा समावेश
- Dilip Ghosh : भाजपने म्हटले- प.बंगालची स्थिती बांगलादेशसारखी; येथे मंदिर तोडणे सामान्य गोष्ट