• Download App
    मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रात मुंबईत लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय; ठाकरे - पवार सरकारचा निर्णय!! | International Music College named after Latadidi in Mumbai, Maharashtra after Madhya Pradesh; Thackeray - Pawar government's decision

    मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रात मुंबईत लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय; ठाकरे – पवार सरकारचा निर्णय!!

    प्रतिनिधी

    मुंबई : गानसम्रानी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने संगीत अकादमी, संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली केली आहे.International Music College named after Latadidi in Mumbai, Maharashtra after Madhya Pradesh; Thackeray – Pawar government’s decision

    आता त्यापाठोपाठ महाराष्ट्रात देखील मुंबईमध्ये लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारले जाणार आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्याच्या निर्णयाची घोषणा केली. मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे.



    मुंबई विद्यापीठात लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व्हावे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. परंतु, आता मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस समोर जागा मिळाली आहे. तेथे 3 एकर परिसरात लता दीनानाथ मंगेशकर अशा नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

    उच्च शिक्षण मंत्रालयाने याआधी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे उद्घाटन लता मंगेशकर यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. परंतु, आता लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने लता दीनानाथ मंगेशकर या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

    मध्यप्रदेश सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने त्यांचे जन्मगाव इंदूरमध्ये संगीत अकादमी महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने आज जाहीर केलेला निर्णय घेतला आहे.

    International Music College named after Latadidi in Mumbai, Maharashtra after Madhya Pradesh; Thackeray – Pawar government’s decision

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ashok Kharat : खरात प्रकरणात पोलिस आयजींचं नाव समोर; अंजली दमानियांचा व्हिडीओतून गंभीर आरोप

    Prakash Ambedkar : SC-ST वर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका; जस्टिस बदर समितीचा अहवाल ‘अवैज्ञानिक’ असल्याचा दावा

    Amravati Horror : अमरावतीत खळबळजनक घटना; 180 तरुणींचे लैंगिक शोषण आणि 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; आरोपी मोहम्मद अयाजला बेड्या