प्रतिनिधी
मुंबई : गानसम्रानी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने संगीत अकादमी, संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली केली आहे.International Music College named after Latadidi in Mumbai, Maharashtra after Madhya Pradesh; Thackeray – Pawar government’s decision
आता त्यापाठोपाठ महाराष्ट्रात देखील मुंबईमध्ये लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारले जाणार आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्याच्या निर्णयाची घोषणा केली. मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठात लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व्हावे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. परंतु, आता मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस समोर जागा मिळाली आहे. तेथे 3 एकर परिसरात लता दीनानाथ मंगेशकर अशा नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
उच्च शिक्षण मंत्रालयाने याआधी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे उद्घाटन लता मंगेशकर यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. परंतु, आता लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने लता दीनानाथ मंगेशकर या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
मध्यप्रदेश सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने त्यांचे जन्मगाव इंदूरमध्ये संगीत अकादमी महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने आज जाहीर केलेला निर्णय घेतला आहे.
International Music College named after Latadidi in Mumbai, Maharashtra after Madhya Pradesh; Thackeray – Pawar government’s decision
महत्त्वाच्या बातम्या
- डॉ.आंबेडकर जन्मभूमी स्मारक वाचविण्यासाठी भीमज्योत मशाल यात्रा पुणे ते महू दरम्यान १५ फेब्रुवारी पासून आयोजन
- महाराज, मोदींना माफ करा म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
- Congress Manifesto : शेतकर्यांची कर्जमाफी, २० लाख सरकारी नोकऱ्या आणि १० दिवसांत विजेचे दर निम्मे! वाचा – काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मोठ्या घोषणा
- Hijab Controversy : बंगळुरूत शाळा-कॉलेजच्या 200 मीटरच्या आत लोकांना एकत्र येण्यास बंदी, उच्च न्यायालयाने प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले