• Download App
    लागोपाठच्या दुसऱ्या सर्व्हेत भाजप - शिवसेना युतीलाच पूर्ण बहुमत; फडणवीसांना पहिली पसंती; ठाकरे - पवारांचे पक्ष तोट्यात!!|In the second consecutive survey, the BJP-Shiv Sena alliance has an absolute majority; First choice for Fadnavis; Thackeray - Pawar's party lost!!

    लागोपाठच्या दुसऱ्या सर्व्हेत भाजप – शिवसेना युतीलाच पूर्ण बहुमत; फडणवीसांना पहिली पसंती; ठाकरे – पवारांचे पक्ष तोट्यात!!

    प्रतिनिधी

    मुंबई : काही दिवसांपूर्वीच झी न्यूजने घेतलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीला 165 ते 185 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर न्यूज एरिना इंडिया वृत्तसंस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात तोच निष्कर्ष रिपीट झाला असून भाजप आतापर्यंत मिळवलेल्या जागांपेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात मिळवेल, असा निष्कर्ष नव्या सर्वेक्षणात काढला आहे. शिवसेना – भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेलच, पण महाविकास आघाडी टिकली, तर त्याचा मोठा फायदा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला मिळत नसून, तो फायदा काँग्रेसला मिळत असल्याचे दिसत आहे.In the second consecutive survey, the BJP-Shiv Sena alliance has an absolute majority; First choice for Fadnavis; Thackeray – Pawar’s party lost!!

    त्या उलट प्रसार माध्यमात सतत आपल्या ताकदीचे नॅरेटिव्ह चालविणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट हे दोन्ही पक्ष तोट्यात असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणाने काढला आहे.



    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची नक्कीच कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. तरी देखील या मोठ्या फेरबदलाचा जनतेवर अनुकूल परिणाम होऊन त्याचा राष्ट्रवादीला कोणताही फायदा होताना दिसत नाही, असाच निष्कर्ष सर्वेक्षणातून निघाला आहे.

    तसेच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस टॉप वर असून ते 35 % नी पास झाले आहेत. बाकीचे सर्व उमेदवार 35 % च्या खाली असून अशोक चव्हाण यांनी दुसरा नंबर पटकावला आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे तळातून अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे आले आहेत.

    न्यूज एरिना इंडिया @NewsArenaIndia महाराष्ट्र विधानसभेचा अंदाज –

    • भाजपा : 123 ते 129
    • शिवसेना एकनाथ शिंदे : 25
    • राष्ट्रवादी : 55-56
    • काँग्रेस : 50-53
    • शिवसेना ठाकरे गट : 17-19
    • इतर: १२

    निष्कर्ष : महाराष्ट्रात भाजपचा आतापर्यंतचा उच्चांक गाठणार आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तसतसे इतरांपैकी कोणीही वाढणार नाही.

    •  एकनाथ शिंदे यांचा शिवसेना SS UBT पेक्षा मोठा पक्ष म्हणून उदयास येईल आणि SS UBT पेक्षा तो संपूर्ण महाराष्ट्राचा पक्ष असेल.
    • भाजपा + इतर + अपक्ष 140 च्या आसपास असतील म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
    •  मुस्लिम MVA ला जोरदार पाठिंबा देतील म्हणून AIMIM चा स्कोअर 0 असेल.
    • NCP आणि INC दोघेही जागांमध्ये किरकोळ वाढ करतील पण बहुमताच्या जवळ जाणार नाहीत कारण उद्धव ठाकरे आता कोकणाबाहेर अजिबात मजबूत नाहीत.
    •  मजबूत स्थानिक उमेदवारांमुळे भाजपने जवळपास 35% जागा जिंकेल.
    •  काँग्रेसला MVA चा सर्वाधिक फायदा होत आहे. MVA शिवाय त्यांना 28 जागाही जिंकता येणार नाहीत.

     मुख्यमंत्री पसंती :

    देवेंद्र फडणवीस (35%), अशोक चव्हाण (21%), अजित पवार (14%), एकनाथ शिंदे (12%), उद्धव ठाकरे (9%), OTH (9%).

    काँग्रेस केवळ त्यांच्या हिकमती असलेल्या उमेदवारांमुळेच जागा जिंकत आहे. जर त्यांनी बाजू बदलली तर त्यांची संख्या कमी होईल. (तिकीट वाटपाबाबत अनेक गृहीतके मांडण्यात आली होती.)

    • न्यूज अरेना इंडिया @NewsArenaIndia ·
    • १७ जून कोकण प्रदेश (75 जागा) –
    • भाजप : 29 – 33, SS शिंदे गट : 11 SSUBT : 14-16 INC : 5-6 राष्ट्रवादी : 7 – 8 इतर : 5
    • मुंबई (36 जागा)
    • भाजपा : 16 – 18 SS (UBT): 9-10 SS शिंदे गट : 2 राष्ट्रवादी : 1 INC : 5 – 6 इतर : 1
    • पश्चिम महाराष्ट्र (58 जागा) –
    • भाजप : 22 – 23, SS शिंदे गट : 1 राष्ट्रवादी : 23 INC : 9-10 SSUBT: 1 इतर: 1मराठवाडा विभाग (46 जागा)
    • भाजप : 19, SS शिंदे गट : 5, SSUBT: 2, काँग्रेस : 10 राष्ट्रवादी : 9 इतर : 1

    In the second consecutive survey, the BJP-Shiv Sena alliance has an absolute majority; First choice for Fadnavis; Thackeray – Pawar’s party lost!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा