• Download App
    नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा एक नंबर राष्ट्रवादीने काँग्रेस - शिवसेनेला मागे ढककले!! । In the Nagar Panchayat elections, BJP's number one NCP pushed Congress-Shiv Sena back !!

    नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा एक नंबर राष्ट्रवादीने काँग्रेस – शिवसेनेला मागे ढककले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणुकीत भाजपने प्रथम क्रमांक राखला असून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस आणि शिवसेनेला मागे ढकलले आहे. एकूण 105 नगरपंचायतीच्या निवडणूक पैकी 65 नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये 18 नगरपंचायती जिंकून भाजपने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीने 16 नगरपंचायती जिंकल्या आहेत. काँग्रेसने 14, तर शिवसेनेने 12 नगरपंचायती जिंकल्या आहेत. In the Nagar Panchayat elections, BJP’s number one NCP pushed Congress-Shiv Sena back !!

    विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिला नंबर मिळवला होता. त्याखालोखाल शिवसेनेचा नंबर होता. परंतु आता नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे घसरण झाली असून शिवसेनेला चौथ्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे.



    कवठेमहांकाळ नगरपंचायत आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी जिंकली आहे तर कर्जत नगरपंचायत रोहित पवार यांनी जिंकली आहे. बच्चू कडू यांनी देखील संग्रामपूरची नगरपंचायत आपल्या ताब्यात ठेवली असून अनेकांनी आपापल्या प्रतिष्ठा राखत आपआपल्या गावातल्या नगरपंचायती ताब्यात ठेवल्या आहेत.

    In the Nagar Panchayat elections, BJP’s number one NCP pushed Congress-Shiv Sena back !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!