वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असताना महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांच्या (जवळजवळ ७६ टक्के) शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या असून त्या खोऱ्याने पैसे खेचत असल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले आहे. (या वृत्ताबाबतची सत्यता फोकस इंडियाने पडताळून पाहिलेली नाही)In Maharashtra, the farmers are poor, Butagri-business companies of Mahavikas Aghadis Ministers are Flourished day by day
नॅशनल क्राईम ब्युरोच्या २०१९ च्या अहवालानुसार राज्यात ३८ टक्के शेतकऱ्यांनी विविध कारणाने आत्महत्या करून जीवन संपविले. मात्र त्याच शेती उत्पादनांच्या सहाय्याने महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी कंपन्या स्थापन करून अनेक पिढ्यांची तरतूद करून घेतल्याचे उघड झाले आहे.
७६ टक्के मंत्र्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापात्रात आपला उत्पन्नाचा स्रोत ‘ शेती व व्यवसाय’ असा केला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे १६१ कंपन्या असल्याची नोंद केली आहे. त्यापैकी ४२ टक्के कंपन्या शेतीपूरक व्यवसायाशी निगडित आहेत.
ऍग्रो प्रॉडक्ट, ऍग्रो ट्रेड आणि ऍग्रोप्रोसेसिंग या नावाने कंपन्यांची नोंद केली आहे. एकूणच मंत्री स्वतःचा विकास करत असताना ते शेतकऱ्यांचा विकास का करू शकत नाहीत. शेतकरी का आत्महत्या करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वाधिक कंपन्या असलेले मंत्री
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : पत्नीच्या आठ कंपन्या
- उपमुख्यमंत्री अजित पवार : पत्नीच्या २३, मुलाच्या ८
- छगन भुजबळ : पत्नी व मुलाच्या १७ कंपन्या
- विश्वजित कदम : १५ ची नोंदणी, १० सक्रिय पैकी ८ खासगी आणि ३ सरकारी
- अदिती तटकरे : १२ मध्ये संचालक, विद्यमान १ कंपनी
- आदित्य ठाकरे : ८ कंपन्या
- राजेश टोपे : खासगी ६ ,वडिलांच्या २ आणि १ सरकारी
- दिलीप वळसे : स्वतःच्या ५, कुटुंबाच्या ५ आणि सरकारी २
- अनिल परब : स्वतःच्या ४, पत्नीची १
- बच्चू कडू : ४ कंपन्या
एक कंपनी असलेले मंत्री
- राजेंद्र शिंगणे, धनंजय मुंडे, यशोमती ठाकूर, उदय सामंत
- दोन कंपन्या असलेले मंत्री
- बाळासाहेब थोरात ( विद्यमान २ , माजी ३), जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड , राजेंद्र पाटील – यड्रावकर, सतेज पाटील, दादा भुसे
तीन कंपन्या असलेले मंत्री
- दत्तात्रय भरणे, प्राजक्त तनपुरे
- कुटुंबियांच्या नावे कंपन्या असलेले मंत्री
- सुभाष देसाई : ६, हसन मुश्रीफ : ५, वर्षा गायकवाड : २, एकनाथ शिंदे : २, उदय सामंत : २
In Maharashtra, the farmers are poor, Butagri-business companies of Mahavikas Aghadis Ministers are Flourished day by day
महत्त्वाच्या बातम्या
- खुशखबर : आता स्वयंसहायता गटांना हमीशिवाय मिळेल 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय
- ऑलिम्पिकमध्ये घुमणार चौकार अन् षटकार! ICC कडून 2028च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाचे प्रयत्न सुरू
- सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला – ऑलिम्पिकसाठी मेहनतीचे फळ मिळाले, पंतप्रधान स्वत : बोलले ही मोठी गोष्ट, सर्वांच्या सहकार्याने येथे पोहोचलो!
- राजकारण्यांना सर्वोच्च दणका : राजकीय पक्षांना उमेदवार घोषित केल्याच्या 48 तासांत गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक!