• Download App
    अनिल देशमुखांवरील निकालात आमची बाजू ऐकून घेतली नाही, ईडीनेच केली उच्च न्यायालयात तक्रार|In Anil Deshmukh case court did not hear our side in the verdict, ED filed a complaint in the High Court

    अनिल देशमुखांवरील निकालात आमची बाजू ऐकून घेतली नाही, ईडीनेच केली उच्च न्यायालयात तक्रार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची संपत्ती जप्त करू नये, असा निर्णय देण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याची तक्रार अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी) उच्च न्यायालयात केली आहे.In Anil Deshmukh case court did not hear our side in the verdict, ED filed a complaint in the High Court

    ही संपत्ती अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर असून, त्यांनी ईडीच्या कारवाईला विरोध करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुढील आदेशापर्यंत आरती देशमुख यांची संपत्ती जप्त करू नये, असा आदेश न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत दिला आहे.



    न्या. जी. एस. पटेल प्रमुख असलेल्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याची परवानगी ईडीला दिली आणि या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे. उच्च न्यायालयाने हा आदेश देण्यापूर्वी तपास यंत्रणेचा युक्तिवाद ऐकून घेतला नाही,

    असे ईडीच्या वतीने अतिरिक्त महान्यायाभिकर्ता अनिलसिंह यांनी न्यायालयात सांगितले. शुक्रवारी सुनावणीत या मुद्यावरील ईडीचा युक्तिवाद होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

    In Anil Deshmukh case court did not hear our side in the verdict, ED filed a complaint in the High Court

     

    Related posts

    Ashok Kharat : खरात प्रकरणात पोलिस आयजींचं नाव समोर; अंजली दमानियांचा व्हिडीओतून गंभीर आरोप

    Prakash Ambedkar : SC-ST वर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका; जस्टिस बदर समितीचा अहवाल ‘अवैज्ञानिक’ असल्याचा दावा

    Amravati Horror : अमरावतीत खळबळजनक घटना; 180 तरुणींचे लैंगिक शोषण आणि 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; आरोपी मोहम्मद अयाजला बेड्या