प्रतिनिधी
पुणे : लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी – शरद पवारांच्या राजकीय कॉम्बिनेशनची चर्चा रंगली. पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पण त्याच कार्यक्रमात मोदींनी पवारांना एक टोला हाणला. पण त्याकडे मात्र पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी पूर्ण दुर्लक्ष केले. तो टोला म्हणजे, मोदी राजवटीत जी नामांतरे झाली, त्यावरून विरोधकांना पोटदुखी झाल्याची टीका मोदींनी केली, हा होता!! If we delete the names of foreign invaders, many will feel sick to their stomachs
आपल्या भाषणात लोकमान्य टिळक आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण सांगताना मोदी म्हणाले, सरदार वल्लभभाई यांनी ते अहमदाबाद नगरपरिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर व्हिक्टोरिया पार्कमध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारायचे ठरविले. मात्र त्याला इंग्रजांनी विरोध केला. तरी सरदार पटेल मागे हटले नाहीत.
मी अध्यक्षपदाचा राजीनामा देईन, पण लोकमान्यांचा पुतळा उभारल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार वल्लभभाईंनी केला आणि अखेर लोकमान्यांचा पुतळा व्हिक्टोरिया पार्कमध्ये उभारलाच. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात वल्लभभाईंनी जो वज्रनिर्धार दाखविला, तसेच आम्ही आज काही करायचा प्रयत्न केला, तर अनेकांच्या पोटातच दुखते. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी परकीय आक्रमकाचे नाव एखाद्या रस्त्यावरून हटवून भारतीय विभूतीच्या नावाने नामांतर केले, तर अनेकांच्या पोटात दुखते, असे मोदी म्हणाले.
पवार संभाजीनगर म्हणत नाहीत
नेमका हाच मोदींनी पवारांना हाणलेला टोला होता. मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले. त्यावेळी मी छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही. औरंगाबादच म्हणेन, असे शरद पवारांनी जाहीरपणे संभाजीनगर मध्ये सांगितले होते. याचा अर्थ औरंगाबादच्या नामांतराची पोटदुखी पवारांना झाली होती. त्यातूनच ते मी संभाजीनगर म्हणणार नाही. औरंगाबादच म्हणेन, असे म्हणाले होते. मोदींनी आज नेमका तोच धागा पकडून विरोधकांना नामांतराची पोटदुखी होत असल्याचा टोला हाणला. मात्र नेमका हाच मुद्दा पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी आपल्या रिपोर्टिंग मधून गायब केला.
If we delete the names of foreign invaders, many will feel sick to their stomachs
महत्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू
- Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!
- 2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!
- Land For Job Scam प्रकरणात ‘ED’चा लालूंना दणका, सहा कोटींची मालमत्ता जप्त!